
शिक्षक सेनेची मागणी
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
शिक्षक संख्येचे शाळानिहाय संतुलन निर्माण करण्यासाठी २०२३-२४ ची संच मान्यता ग्राह्य धरावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी महाराष्ट्र शासनाचे ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण यांनी दिली.
पुढे निवेदनात असे नमूद केले की, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक संख्येचे निर्धारण करताना २०२२-२३ च्या पटसंख्येनुसार केलेल्या संचमान्यतेनुसार केलेल्या संचमान्यताप्रमाणे शिक्षकांना अतिरिक्त ठरवून रिक्त जागेवर त्यांचे समावेशन केल्यास २०२३-२४ मध्ये वाढीव विद्यार्थी संख्या असुन ही २०२२-२३ च्या कमी संख्येमुळे तेथील शिक्षक अतिरिक्त ठरतील व समावेशन केलेल्या ठिकाणी २०२२-२३ पेक्षा विद्यार्थी संख्या २०२३-२४ मध्ये कमी झाली असल्यास समावेशातील शाळेत ते पुन्हा अतिरिक्त ठरतील तेव्हा सदरील परिस्थिती लक्षात घेऊन २०२३-२४ मधील विद्यार्थी संख्येला अनुरूप शिक्षक संख्या संतुलनाची प्रक्रिया पार पडेल असे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने ज.मो.अभ्यंकर यांनी नमूद केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण यांनी दिली.