
नाशिक-पुणे महामार्गावरून विठ्ठल नामाचा आणि साईनाथाचे नामस्मरण करत शिर्डीहून आळंदीकडे जाणाऱ्या भाविकांच्या दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 ते 3 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत.या अपघाताला कारणीभूत असणारा ट्रक क्रमांक MH 12 VT 1455 वरील चालक मद्यपान करुन वाहन चालवत होता. ट्रक चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजत आहे. या अपघातातील मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाला अटक केली आहे. या अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली. तसेच अपघातातील जखमींना तातडीने आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.या अपघातामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती.