
दै.चालू वार्ता
वाशिम प्रतिनिधी दिनकर गडदे
वाशीम / प्रसंग मागासवर्गीय समाज कल्याण संस्था जयपूर व मैनाबाई मानकर बहु. उदेशिय संस्था बेलोरा जी . यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबाना आदरांजली वाहण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना विविध सेवा दिल्या जातात ,मागील 20 वर्षापासून सादर संस्थेच्या वतीने शिवाजी पार्क दादर येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केल्या जाते य शिबिरात नामवंत डॉक्टर ,हृदय तज्ञ,अस्थी तज्ञ,मधुमेह तज्ञ, नेत्र तज्ञ,स्त्री रोग तज्ञ, ई .एन. टि .त्वचा रोग व जनरल तपासणी करून मोफत औषधे दिली जातात , या शिबिराचे उद्घाटन जे.जे हॉस्पिटल चे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.रेवत कानिंदे ,बंजारा क्रांती दलाचे संस्थापक राकेश जाधव साहेब हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गजपाल इंगीले ,अमोल मानकर यांच्या उपस्थितीत करणार आहेत . या वेळी डोळ्याची तपासणी करून 500 चस्मे मोफत देण्यात येणार आहेत .या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांनी या सेवेचा लाभ घ्यावा,इतर अनुयायांना लाभ घेण्यास सांगावे असे आवाहन डॉ .इंगोले यांनी केले आहे,याच ठिकाणी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या अंतर राष्ट्रीय संस्थेच्या वतीने युवकांसाठी विविध विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे ,युवकाची नोंदणी करून त्यांना विविध उद्योग ,व्यवसाय ,स्पर्धा परीक्षेची तयारी इतादी विषयावर मार्गदर्शन दिल्या जाणार आहे ,स्टॉल क्र 200,201,203जी नॉर्थ टॉवर चया बाजूला, बी एस पी च्या स्टॉल जवळ शिवाजी पार्क दादर मुंबई . महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारास व स्मृतीस विनम्र अभिवादन अभिवादक डॉक्टर गजपाल पी इंगोले संस्थापक अध्यक्ष प्रसंग मागासवर्गीय समाज कल्याण संस्था जयपूर…