
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):बारामती लोकसभेच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे जिल्ह्यात पदाधिकारी निवडीचा धडाका लावला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि मीडिया या क्षेत्रातील नियुक्त्यांना वेग आला असून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सोशल मीडिया अध्यक्ष पदी इंदापूर तालुक्यातील व्याहळी गावचे सुपुत्र, पक्षाशी सदैव निष्ठावान, आणि सोशल मीडियावर आक्रमक भूमिका घेऊन पक्षासाठी भांडणारे कार्यकर्ते सोमनाथ पांडुरंग भोंग यांची संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती केली आहे.
बारामती लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त सोशल मीडिया अध्यक्ष सोमनाथ पांडुरंग भोंग यांनी सांगितले की, येत्या काही दिवसात आम्ही प्रविण भैय्या मानेंच्या नेतृत्वाखाली आणखी लोकांना टीममध्ये जोडणार आहोत आणि सोशल मीडिया टीममध्ये गाव आणि वार्ड स्तरावर लोकांची नियुक्ती करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच सुप्रिया सुळे यांनी आजपर्यंत जे काम केले आहे त्याबद्दल जनजागृती करणार आहोत. येत्या काळात सोशल मीडिया माध्यमातून आम्ही संपूर्ण मतदारसंघामध्ये पक्षाचे जाळे तयार करून महाराष्ट्रात सरकार बनवणे त्याचप्रमाणे गल्ली पासून दिल्ली पर्यंत सरकार बनविण्यासाठी पूर्ण कटिबद्ध आहोत… पवार साहेब, सुप्रियाताईंबाबत सोशल मीडियावर चुकिची माहिती पसरवणाऱ्यांना जागा दाखवून देऊ…
यावेळी पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष पैगंबर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा छायाताई पडसळकर ,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…