
भारती विद्यापीठ,पुणे संचलित बंदरकाठा माध्यमिक विद्यालय मजगाव – ताम्हाणे ता. तळा येथे महामानवास शाहीर भीमराव सूर्यतल यांनी गायनाच्या माध्यमातुन आदरांजली वाहिली.
दोनही कार्यक्रमानी म्हसळ्यात उत्कृष्ट संस्कृतीच्या आदर्शाचे केले सादरीकरण
दैनीक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो आज म्हसळा शहरांत सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत बौद्धजन पंचायत समितीतर्फे पदाधिकारी अनंत गणू येलवे, सुभाष जाधव, विठोबा पवार, राजेश तांबे , शिला पवार , रमेश तांबे ,नगरसेवक करण गायकवाड यशवत सुर्वे, अनंत पवार, ममता येलवे यानी तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, नगर पंचायत कार्यालयात तर सायंकाळी भारतीय बौद्ध महासभेतर्फे पोलीस स्टेशन मध्ये ए.पी.आय संदीपान सोनवने यांचे हस्ते मेणबत्ती प्रज्वलन करून नगर पंचायत म्हसळा शहरांत कॅन्डल मार्च काढण्यात आला. समारोप एस .टी स्टँड येथे झाला याचे नेतृत्व संतोष जाधव,सुरेश जाधव, सुभाष साळवे ,सुर्यकांत तांबे, भिमराव सुर्यातळ, रत्नमाला जाधव यानी केले .महापरीनिर्वाण दिन साजरा करते वेळी तहसीलदार समीर घारे, स .पो. नी सोनवने,नायब तहसीलदार गणेश तेलंगे, निवडणूक नायब तहसीलदार धर्मराज पाटील , सचिन धोंडगे, विश्वास पाडावे, अन्य महसुल आणि पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी होते .
महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा आणि अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला तसेच भारतातील वर्ग लढ्याला आणि जाती अंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काम केले होते असे सहाय्यक पोलीस नीरिक्षक संदिपान सोनावने यानी सांगून दोनही कार्यक्रमानी म्हसळ्यात उत्कृष्ट संस्कृतीच्या आदर्शाचे सादरीकरण केले असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन करताना सोनवने यानी सांगितले .
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान होय. मा. श्री. बोबडे सर…
म्हसळा तालुक्यातील भारती विद्यापीठ,पुणे संचलित बंदरकाठा माध्यमिक विद्यालय मजगाव – ताम्हाणे ता. तळा येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमिताने विनम्र अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रास्ताविक भाषणात शाळेचे शिक्षक मा. श्री बोबडे सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी व समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना. ज्या प्रतिकूल परिस्थितीत हि बाबासाहेबानी शिक्षण घेऊन सर्वसामान्य बहुजनातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडी केली ज्या तुन माणूस म्हणून जगण्याचे अधिकारही संविधानाच्या माध्यमातून त्यांना मिळवून दिले . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पहाडी आवाजाचा बादशाह “शाहीर भीमराव सूर्यतळ “, मा संदिप गायकवाड, मा. जगनाथ तांडेल सरपंच वाशी , मा. मगर सर मुख्याद्यापक रा. जि. प. शाळा ताम्हाणे, श्री आर. एन.जाधव हे उपस्थित होते या वेळी शाहीर सूर्यतळ यांनी आपल्या पहाडी आवाजाने कार्यक्रमास रंगत आणून डॉ बाबासाहेबाना आपल्या शाहिरीच्या व पहाडी आवाजाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली शाळेच्या जवळ जवळ 20 विद्यार्थ्यानी हि या मानवतेच्या मुक्तिदात्याना आपल्या विचाराच्या माध्यमातून अभिवादन केले, शाळेच्या शिक्षिका कु. अर्चना येलवे यांनी हि भारतीय घटनेच्या व स्त्री मुक्ती दात्यांना आपल्या विचाराच्या माध्यमातून त्यांनी बहुजन समाजांना कश्या पद्दतीने अधिकार प्राप्त करून दिले या विषयी विचार मांडले विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब यांना गीता च्या माध्यमातून अभिवादन केले या वेळी विचारपिठावर शाळेचे मुख्याद्यापक मा.अप्पासाहेब नलगे शाळेचे शिक्षक श्री. शिवरकर, श्री लहारे सर , मेहता मॅडम, श्री अनिल वसावे, मीनाक्षी जैन, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री लहारे सर यांनी केले तर आभार श्री अनिल वसावे सर यांनी केले.