
रामायणाचार्य श्री ह भ प रामरावजी महाराज ढोक यांच्या रामकथेने सप्ताहास सुरूवात…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड : –
तालुक्यातील मौजे रिसनगाव येथे श्री संत बाळूमामा कलशारोहण सोहळ्यानिमित्त मंगळवार पासून अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री तुलशी रामायण कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्यास दि. १२ डिसेंबर पासून प्रारंभ करण्यात आले असून दि. १२ पासून दि. १८ डिसेंबर पर्यंत दैनंदिन रामायण कथाकार रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांच्या रसाळ वाणीतून तुळशी रामायण कथा कथन केली जाणार आहे. तर २१ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
श्री संत बाळूमामा कलशारोहण सोहळ्यानिमित्त लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे दि. १२ पासून दि. २१ डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दि. १२ रोजी मंगळवारी पासून दैनंदिन सकाळी ४ ते ६ काकडा भजन, ७ वाजता श्रींची आरती, ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, ९ ते ११ गाथा भजन, दुपारी १ ते ४ दरम्यान हभप रामराव महाराज ढोक यांचे श्री तुलशी रामायण कथा तसेच दि. १२ रोजी रात्री ९ ते ११ दरम्यान हभप पांडूरंग महाराज उगले शास्त्री यांचे हरी कीर्तन, दि. १३ रोजी रात्री हभप सुदाम महाराज पानेगावकर यांचे हरी कीर्तन, दि. १४ रोजी हभप विलास महाराज गेजगे, दि. १५ रोजी हभप अक्रूर महाराज साखरे, दि. १६ रोजी हभप प्रकाश महाराज साठे, दि. १७ रोजी हभप चैतन्य महाराज राऊत, दि. १८ रोजी हभप विशाल महाराज खोले, दि. १९ रोजी हभप माऊली महाराज पठाडे, दि. २० रोजी हभप अच्युत महाराज दस्तापुरकर, दि. २० रोजी हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, यांचे हरी कीर्तन तर दि. २१ रोजी हभप समाधान महाराज भोजेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दि. २१ रोजी दुपारी १ ते ६ वाजता भव्य यात्रा मोहत्सव, नगर प्रदक्षिणा व पालखी सोहळा त्यानंतर श्री संत बाळूमामा मंदिर कलशारोहण व गुरुपुजन सोहळा होणार आहे. सदरील सोहळ्यात मृदंगाचार्य, गायनाचार्य यांचा सहभाग असणार आहे.
सदरील उत्सव सोहळ्यात पंचक्रोशीतील बहुसंख्य भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सकल रिसनगाव ग्रामस्थांनी केले आहे.