पूर्ववैमनस्यातून तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळी झाडली…
पोटात गोळी लागल्याने तरुण गंभीर..
दे.चालु वार्ता
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळूंके
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुका पानेवाडी येथे पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ. दारू पिऊन आठवडा बाजारात हातात गावठी पिस्तूल घेऊन. गोंधळ घालणाऱ्यांने समजावून सांगण्यास गेलेल्या तरुणाच्या पोटात गोळी झाडल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथे गुरूवारी दुपारी दोन च्या सुमारास घडली. अमोल पांडुरंग शिंदे वय 35 रा. पानेवाडी. तालुका घनसावंगी असे. जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहे. घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथील गुरुवारी आठवडा बाजार असताना. दुपारी दोन वाजेच्या सुमारात संशयित .कुमार शिंदे नावाच्या युवकांनी दारू पिऊन हातात गावठी पिस्तूल घेऊन गोंधळ करत होता. त्याच्या वेळी त्याला गावातील काही तरुणाने समजावून सांगण्यास गेले. त्यावेळी त्याने अमोल शिंदे यांच्या पोटात गोळी झाडली त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने आठवडा बाजार बंद करून घनसावंगी पोलिसांना माहिती दिली .तर जखमीला तातडीने घनसांवगी येथील रुग्णालयात पाठवण्यात आले होते .तिथे जालना येथे रेफर करण्यात आले. परंतु पोटात गोळी लागल्याने डॉक्टरांनी त्याला तपासणी छत्रपती संभाजीनगर येथे रेफर केले आहे
ग्रामस्थांना ठेवलं बांधून…
ज्या व्यक्तीने गोळी झाडली आहे, त्यास ग्रामस्थां सदरील तरुण हा दारू पिऊन नागरिकांना गावठी पिस्तूलचा धाक दाखवून गोंधळ घालत होता. त्याने अमोल शिंदे त्याच्यावर गोळीही झाडली. त्यानंतर ग्रामस्थांनी त्याच्या हात पाय बांधून ठेवले त्याची माहिती समजते._घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्याच्याकडे गावठी पिस्तुल व जीवंत काडतूसे जप्त करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले.