
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड – मुखेड मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉ तुषारभाऊ राठोड यांचे लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांच्या वतीने लोह्याच्या पारंपरिक पद्धतीने खारीक खोबऱ्यांचा हार घालून अभिष्टचिंतन करण्यात आले.
मुखेड मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉ तुषारभाऊ राठोड यांना लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांनी प्रत्यक्ष अभिष्टचिंतन सोहळ्याच्या ठिकाणी जाऊन दिर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लोहा शहराच्या पारंपारिक पद्धतीने खारीक खोबऱ्यांचा हार , शाल , टोपी , घालुन भव्य दिव्य अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष हनुमंतभाऊ लांडगे , शिवसेना ( शिंदे ) गटाचे शहरप्रमुख युवराजभाऊ वाघमारे पञकार बाळासाहेब कतुरे सह आदी मान्यवर उपस्थित होते.