दै.चालू वार्ता
तुषार नाटकर, पैठण
नूतन वर्ष आगमनाच्या निमित्त पैठण कराओके ग्रूपच्या वतीने पैठण येथील इंद्रावती मंगल कार्यालयाच्या सभागृहात “गीत गाता चल” या हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी संतोष तांबे, रेडी म्यूजिक चे
रतन नागरकर, किशोर चौहान, डॉ पंडित किल्लारीकर, प्रा. संतोष गव्हाणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीतू परदेशी, एस. टी महामंडलाचे अधिकारी राजेंद्र कोलते, शंकर परागे, प्रा. अविनाश हिंगणे, प्रा. महेश गोंडे, आकाशवाणी श्रोता संघाचे सुरेश जाधव, माजी नगरसेवक संजय सोनारे, आश्विनी लखमले, जलकन्या काळे, डॉ. सासणे, इनर्व्हील क्लबच्या अपर्णा गोर्डे, कल्पना लोखंडे, केंद्रप्रमुख प्रकाश लोखंडे, ज्येष्ठ पत्रकार मदन आव्हाड, उपस्थित होते.
या प्रसंगी पैठण येथील पैठण कराओके ग्रूपच्या सर्व गायक कलाकार वनिता सोनवणे, डॅनियल इंगळे, रुपेश चौहान, डॉ. मनीषा सासणे, सुभान पठाण, सुनीता राठीड, सुहास कुलकर्णी, अनिल जोशी, शुभांगी जोशी, व्यंकटेश जहागिरदार, यांनी
हिंदी चित्रपट सृष्टीतील महान गायक
मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश लता मंगेशकर, आशा भोसले, जगजितसिंग, शैलेंद्र, कुमार सानू, अलका याग्निक यांनी गायलेली सदाबहार तथा अजरामर झालेली गाणी सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विजय सुते यांनी आपल्या खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रससंचालन करीत प्रसिद्ध उद्घोषक “अमीन सयानी” यांची आठवण करुण दिली.
सुभान पठाण यांच्या “सांसो की जरूरत है जैसे” व सुनीता राठौड़ यांच्या सह गाईलेले “हम तुम्हे इतना प्यार करेंगे”, तर व्यंकटेश जहागिरदार यांच्या सह “कोरा कागज था ए मन मेरा”, डेनियल इंगळे यांच्या “मेरे दिल मे आज क्या है…”, व सुहास कुलकर्णी यांच्या “हम तुम्हें चाहते है ऐसे”, आणि या गीता सह वनीता सोनावणे यांच्या “तूने ओ रंगीले कैसा जादू किया” आदीं गीतांना श्रोत्यांची
उत्स्फूर्त “वन्स मोअर” ची दाद मिळाली.
पैठण मधील नवोदित कलाकारांना कलेचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन
देण्यासाठी कार्यरत असलेल्या
“पैठण कराओके क्लब” च्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याबद्दल संयोजक केदार मिरदे व बजरंग काळे यांनी रसिक श्रोत्यांचे आभार व्यक्त केले.
