दै.चालू वार्ता
पैठण प्रतिनिधी, तुषार नाटकर –
पुरुषोत्तम रामाच्या मंगल अक्षता, दक्षिण काशी पैठण येथे गाव प्रदक्षिणान कलश मिरवणूक सोहळा उत्साहात संपन्न झाला.
शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात कलशाची विधिवत पुजा करून कलश मिरवणूकी ची सुरुवात करण्यात आली. शांतीब्रम्ह संत एकनाथ मंदिरातील मंडपातील दृश्य नयन रम्य असंगीतमय, आध्यात्मिक वातावरणात वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी संत मंडळी संह सर्व पैठण वासियांनी टाळ, मृदंगाच्या गजरात राम नामाचा गजर करीत सहभाग घेतला. आशा पवित्र सोहळ्यात आर्य चाणक्य विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, लव, कुश या वेशात सहभाग घेत पैठण वाशियांना श्रीरामाच्या आठवणी ताज्या केल्या. जागोजागी प्रभु श्रीरामाचा ध्वज घेऊन रामनाम गजर केला महिला भगिनी, देखील कलश घेऊन नृत्य, फुगडीचा आनंद घेतला. आयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या मंगल अक्षता कलश मिरवणूक उत्साहात संपन्न झाली.
पैठण येथील वारकरी संप्रदायाच्या जवळपास 400 विद्यार्थी, राम भक्त यांच्या मोठ्या उपस्थित कलश मंगल अक्षता कलश मिरवणूक काढण्यात आली होती. टाळ, मृदूंग यांच्या गजरात भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. सोबतच बँड -डीजे यामध्ये नृत्य, फुगडी घालत आपला उत्सव जगावला. कलश मिरवणूक बाहेरील नाथ मंदिर, खंडोबा मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्टॉप, महाराणा प्रताप चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भाजी मार्केट, गजाचा मारूती, या मार्गावर मोठ्या संख्येने नागरिकांनी रांगोळी सडा करत या मिरवणूकीचे स्वागत गेले. मोठ्या प्रमाणात पुष्प वर्षाव करण्यात आला होता. राममंदिर येथे श्री रामाचीआरती करण्यात आली.
श्रीरामाच्या जयघोषाने सर्वपरिसर दुमदुमत गेला, भव्य दिव्य मिरवणुकी मध्ये वारकरी संप्रदाय, माहेश्वरी मंडळ, संस्कृती संवर्धन, महाराणा प्रताप मंडळ, गणेश मंडळे सकल रामभक्तांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
