माहिती अधिकार महासंघ रत्नागिरी जिल्हा सचिव कोठारकार यांचा आरोप…
समिर शिरवडकर -रत्नागिरी
रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील पंचायत समिती राजापूर मधील शिक्षण विभाग या मध्ये खरोखरच माहिती अधिकार अधिनियम बाबत उदासीनता आहे.याचा प्रत्यय माहिती अधिकार कार्यकर्ते कोठरकार याना या कार्यलयातून आला आहे.माहिती अधिकार जेव्हा सादर करून ३० दिवसात त्याचे उत्तर अपेक्षित असते किव्हा पत्र दिले जाते.पंरतु माहिती अधिकार कायदाचे ज्ञान नसलेले हे प्रकार होऊ शकतात, त्यासाठू वरीष्ठ अधिकारी वर्गाकडून वेळोवेळी त्यांना माहिती अधिकार अधिनियम २००५ चे प्रशिक्षण दिले पाहिजे.
शिक्षण विभाग राजपूर मधील माहिती मागत असताना,प्रथम अपील श्री कोठरकार यांनी दि.१५/०९/२३ रोजी दाखल केले होते.परंतु असे समजते की आजुनही त्या विभागांत जण माहिती अधिकारी पद रिक्त आहे,या पदाशिवाय निर्णय होऊ शकत नाही,परंतु गट शिक्षण अधिकारी श्री. उत्तम शिवाजी भोसले यांनी सांगितलं की जण माहिती अधिकारी, आणि प्रथम अपिलीय अधिकारी सुद्धा मिच आहे..ही संपुर्ण माहिती अधिकार अधिनियम २००५ ची चेष्टा आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.प्रथम अपील दि.१५/९/२३ रोजी दाखल केले असून तब्बल ३ महिन्यात सदर विषयची सुनावणी दि.०४/०१/२४ ला लावली आहे ही शोकांतिका आहे.
समंदीत विषय हा शिक्षण मुख्यलाय बाबत असलेने वेळ काढू पणा केली जत आहे.असा आरोप श्री कोठारकार यांनी शिक्षण विभाग राजापूर उत्तम शिवाजी भोसले यांचायवर केला आहे.
