
खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे खरे श्रेय…
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- नांदेड जिल्हातील कंधार तालुक्यातील सिरसी बु येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.व्यंकटी जाधव, तसेच पेठवडज येथील सामाजिक कार्यकर्ते कंधारे पांडुरंग,वडजे माधव, शिंदे पप्पू यांची अनेक वर्षांपासूनची नांदेड बिदर नवीन रेल्वे मार्गाची मागणी भारताचे लाडके पंतप्रधान श्री.नरेद्रभाई मोदींजी यांच्या कडे केली होती.तसेच रेल्वे मंत्री यांच्याकडे नविन रेल्वे मार्गाची मागणी केली होती.तसेच नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे नांदेड बिदर रेल्वे मार्गाची मागणी केली होती.तसेच दैनिक चालु वार्ता पेपर ने वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करून सरकार पर्यंत ही माहिती कळविली होती. महत्वाचे म्हणजे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी मोदींजी यांना रेल्वे मार्गाची अत्यंत आवश्यकता असून शिख समुदायाची मोठी सोय होईल नांदेड येथील गुरूद्वारा तसेच बिदर येथिल गुरूद्वारा येथे दर्शनासाठी सोईचे होईल.तसेच शेतकरी, व्यापारी, नोकरदार, विद्यार्थ्यी यांची सोय होईल असे खासदार साहेबांनी माननीय पंतप्रधान साहेबांना व रेल्वे मंत्री साहेब यांना तळमळीने सांगितले.त्यामुळे त्यांच्या या रेल्वे मार्गाच्या मागणीला मंजुरी देण्यात आली आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून दैनिक चालु वार्ता ने वेळोवेळी नांदेड बिदर रेल्वे मार्गाच्या मागणीची बातमी प्रसिद्ध केली होती.देशाचे माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्रभाई मोदींजी, माननीय रेल्वे मंत्री, नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर, दैनिक चालु वार्ताचे मुख्य संपादक श्री.डि.एस.लोखंडे पाटील यांचे सामाजिक कार्यकर्ते व्यंकटी जाधव, पांडुरंग कंधारे, माधव वडजे , पप्पू शिंदे यांनी आभार मानले आहेत.सर्वत्र अभिनंदन केले जात आहे रेल्वे मार्गाची चर्चा सर्वत्र होत आहे नांदेड बिदर या नवीन रेल्वे मार्गावरील जनतेनी सर्वांचे आभार मानले आहेत.यात्रेकरू तसेच व्यापारी यांनी आनंद व्यक्त केला आहे.