
दै.चालु वार्ता
कुरूळा प्रतिनिधी वैजनाथ गिरी
नांदेड/कंधार :धर्मापूरीतांडा ता.कंधार येथील उपक्रमशील शिक्षिका,कवयित्री अनिता दाणे-जुंबाड यांना शोषित पिछडा संघटनेच्या वतीने दिला जाणारा सत्यशोधक शिक्षकरत्न पुरस्कार घोषित झाला होता.एका कार्यक्रमात माजी खा.डॉ. व्यंकटेश काब्दे ,बीपीएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एस.जी.माचनवार,राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मणराव हाके,लसाकमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे, बालाजी ईबितवार आदी मान्यवरांच्या हस्ते एका कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सत्यशोधक शिक्षकरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. दैंनदिन अध्यापनासह उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षिका व शिक्षकांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला होता.धर्मापूरीतांडा ता.कंधार येथील उपक्रमशील शिक्षिका,कवयित्री व विविध विषयावर सातत्याने प्रासंगिक लेखन करत त्यांनी सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक क्षेत्रात आपले योगदान देत असतात.कोरोना काळात त्यांनी गृहभेटीतून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात कायम जोडण्याचे काम काम केले.याची दखल घेऊन शोषित पिछडा संघटनेने त्यांना सत्यशोधक शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर केला होता.एका कार्यक्रमात अनिता दाणे-जुंबाड व पती माधवराव जुंबाड यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला.याप्रसंगी कार्यक्रमाला सायन्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. लक्ष्मणराव शिंदे, उमेशराव पांचाळ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मारुती लुटे यांनी केले तर मानपत्राचे वाचन प्रा.डॉ. रघनाथ शेटे यांनी केले.प्रास्ताविक रवींद्र बंडेवार यांनी केले. प्रा. डॉ. बालाजी यशवंतकर यांनी आभार मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय पिछडा शोषित संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीशचंद्र शिंदे ,प्राध्यापक संघठनेचे अध्यक्ष प्रा.डॉ.श्रीमंत राऊत,डॉ.अमोल काळे ,महासचिव राजेशजी चिटकुलवार , डॉ.दिलीप काठोडे, राजेश चिटकुलवार, प्रज्ञाधर ढवळे,गंगाधर नंदेवाड,अरूणा पुरी,चंद्रकला चपलकर, संजय मोरे,व्यंकटराव पार्डीकर, डी.एम.हनमंते,रमेश गोवंदे, गोविंदराम शूरनर, गोडसे महाराज आदीची उपस्थिती होती.