
वैजापूर व कन्नड तालुक्यातील घटना…
दै.चालु वार्ता
वैजापूर प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
वैजापूर छत्रपती संभाजीनगर – वैजापूर शहरामध्ये आणि कन्नड तालुक्यातील चापानेर मध्ये दोन एटीएम फोडण्यात आल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही एटीएम एकाच रस्त्यावर आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार चापानेर येथील एसबीआय बँकेच्या एटीएममधून 22 लाख आणि वैजापूरच्या आयडीबीआय बँकेच्या एटीएममधून 16 लाख चोरीला गेल्याची माहिती आहे. या दोन्ही घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच, आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे हे दोन्ही एटीएम एकाच मार्गावर असल्याने, एकाच टोळीने हे चोरी केली असल्याचं बोललेलं जात आहे. विशेष म्हणजे एटीएममध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी ओळख लपवण्यासाठी सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला. त्यानंतर आतमध्ये प्रवेश करत गॅस कटरने दोन्ही एटीएम कापले. दोन्ही एटीएममधून अंदाजे ३८लाख रुपये पळवल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच बँक अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. तर, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे कन्नड तालुक्यातील चापानेर आणि वैजापूरमध्ये एकाच रात्री दोन एटीएम फोडल्याची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या पथकाकडून दोन्ही घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. सोबतच परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी देखील केली जात आहे. तसेच, ठसेतज्ञ आणि श्वान पथकाला देखील बोलावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत…