
दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
पंकजा ताईला मत म्हणजे विकासाला मत…
भाजप महा युतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार हे बीड येथे आले असताना त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की वेगवेगळ्या जाहीर सभेच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. विरोधक विनाकारण समाजामध्ये गैरसमज निर्माण करत आहेत. त्याच्यामुळे मी आज आवर्जून आपल्या बीड जिल्ह्याच्या परिसरामध्ये आलोय. पुढे अजित दादा म्हणाले की आपल्याला विनंती करेन मित्रांनो बीड लोकसभेचा नेतृत्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलं होतं सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा चालणारा नेता म्हणजे मुंडे साहेब. सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा चालणारा अशा प्रकारचा नेता म्हणजे मराठवाड्याचे दैवत गोपीनाथराव मुंडे साहेब हे होते.याच मतदारसंघातन मला आठवतंय मला राजकारणाच्या आवड आहे . १९६७ साली क्रांतिसिंह नाना पाटील यांना देखील लोकसभेमध्ये बीड जिल्ह्याने निवडून पाठवलं क्रांतिसिंह नाना पाटील सांगली सातारचे परंतु जनहितासाठी संघर्ष करणाऱ्या नेतृत्वांना हा मतदार संघ कायम साथ देत आलेला अशा प्रकारचा आपला बीड जिल्ह्याचा इतिहास आहे. इथे कोणत्याही जातीपातीला थारा नाही विकासाच्या मुद्यावर येथे मतदान होते. मित्रांनो बीड लोकसभे साठी १३ मे ला मतदान होणार आहे आपल्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे या भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे. बीड जिल्ह्याच्या जनतेसाठी न्याय आणि हक्कासाठी पंकजा मुंडे या कायमच भूमिका घेऊन लढत आहेत, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पंकजा मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या संघर्षाचा आणि विचारांचा वसा घेऊन वाटचाल करतायेत त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो व पंकजाताई मुंडे यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी विनंती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांनी केली.