
दै चालु वार्ता
प्रतिनिधी:बद्रीनारायण घुगे
श्रीक्षेत्र देहू येथील देहूनगरपंचायतचे दमदार नेतृत्व आणि कर्तव्यदक्ष , तरुणांचे आशास्थान असलेले देहूनगर पंचायतीचे लोकप्रिय नगरसेवक प्रवीण काळोखे यांचा वाढदिवस ,गुरुवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
या वाढदिवसानिमित्त अंध अपंग व्यक्तींना कपडे मिठाईचे वाटप तसेच भरती असलेले हाॅस्पिटलमधील पेशंटला नारळ पाणी सफरचंद वाटप करण्यात आले त्याबरोबरच अनाथ विद्यार्थीना वही पुस्तक पेन देण्यात आले यावेळी दहूनगर पंचायतीच्या वतीने देहूच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे ,नगरसेवक योगेश काळोखे ,योगेश परंडवाल ,पूजा काळोखे ,मयूर शिवशरण ,राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विवेक काळोखे ,स्वप्नील हगवणे ,अमोल दिवटे ,सुमित काळोखे ,सुमित काळोखे ,श्रीराम मोरे ,किशोर कदम ,प्रशांत काळोखे ,श्रावण हगवणे ,दीपक काळोखे ,अक्षय धुमाळ ,सचिन हगवणे आदींनी केक कापून प्रवीण काळोखे यांचा वाढ दिवस साजरा केला.तर प्रवीण काळोखे यांच्या चाहत्यांनी दिवसभर शुभेच्छाचां वर्षाव केला.प्रवीण काळोखे यांनी देखील सर्वांना धन्यवाद दिले.