
प्रतिनिधी :अशोकराव उपाध्ये/ कारंजा लाड
सामुदायिक प्रार्थना मंदिर . परिसरात मंगरुळ येथे दि13 जून रोजी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा सडक व परिवहन खात्याचा कारभाराची धुरा हाती घेतल्याचे औचित्य साधत सर्वधर्म मित्र मंडळाच्या वतीने “सुरक्षित थांबा – अपघात थांबवा” अभियानाची चार चाकी गाड्यांना रेडियम स्टिकर लावून सुरुवात करण्यात आली.
गत दहा वर्षात शून्य महामार्ग असलेल्या वाशीम जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून ३८५ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाले. त्यामुळे आपसूकच भरधाव वाहने चालवणे, महामार्गावर वाहन तळाप्रमाणे ऑटो, चारचाकी गाड्या, ट्रक्स, खाजगी व शासकीय बसेस बिनधास्तपणे पार्किंग केल्या जातात. रात्रीच्या वेळेस किंवा पावसाच्या वेळी अनेक अपघात वाहनास मागून धडक लागल्याने होत आहे. याची खबरदारी म्हणून सर्वधर्म मित्र मंडळ ज्या चार चाकी वाहनांच्या मागे रेडियम स्टिकर नाही, त्या वाहनांना मोफत पणे दोन रेडियम स्टिकर पट्टी लावून दिल्या जात आहे. “सुरक्षित थांबा – अपघात थांबवा” ह्या अभियाना अंतर्गत हा छोटा उपक्रम राबविल्या जात आहे.
यावेळी सास रोड सेफ्टी अभियानाचे प्रमुख श्याम सवई कारंजा, जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी मंगरूळपीर, सामाजिक कार्यकर्ते अविनाश मारशेटवार, गोविंदप्रसाद, परवेज शेख वाशीम, सर्वधर्म मित्र मंडळ सास शोध व बचाव पथकचे दिपक सोनवणे, रोहित कुळकर्णी उपस्थित होते.