
दै.चालु वार्ता.प्रतिनिधी
अशोक कांबळे
—————-
गारगोटी: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ यांच्यातर्फे सोमवारी बकरी ईद निमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
धर्माने सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये “त्याग” हे महत्वाचे मूल्य आहे. ईस्लाम धर्मातही उच्च ध्येय सिध्द करण्यासाठी “कुर्बानी” किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ‘ईद-उल-अजहा (बकरी ईद) चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. या निमित्ताने बकरे अथवा इतर प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते.
आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, सर्व धर्मियांनी धार्मिक सण हे अधिकाधिक समाजाभिमुख व मानवतावादी करणे हे धर्माचेच उन्नयन आहे.
हाच विचार समोर ठेवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ कोल्हापूर यांनी एक वेगळा उपक्रम आयोजित केला आहे.
“बकरी ईद” निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा व या प्रथेला पर्याय म्हणून सोमवार दि. १७ जून २०२४ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे असे आव्हान केले आहे की “प्रत्येक धर्म स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो…!!!
एक स्वेच्छा रक्तदाता देईल रुग्णाना निरामय जीवन जगण्याच स्वातंत्र्य, उच्चनिचतेचे भेद विसरायला लावणारी निखळ समता, रक्ताने नाते निर्माण करणारी अनोखी बंधुता! चला रक्तदान करुया, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता प्रस्थापित करुया….!
मुस्लीम बांधवांसमवेत आपण सगळे धर्म-जाती पलीकडे जाऊन मानवतेसाठी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन वैज्ञानिक दृष्टीकोन जपूया…” महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
रक्तदाता म्हणून आपले नाव नोंदवण्यासाठी पुढील नंबरवर संपर्क करावा
मोहित पोवार 9028784423
करवीर शाखा कार्याध्यक्ष
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
शामल दीपा +919823923332
कोल्हापूर शहर शाखा कार्याध्यक्ष,
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
गुलाब अत्तार
+919921207372
मुस्लीम सत्यशोधक मंडळ, कोल्हापूर
राहुल सुतार
+917875163216
जिल्हा कार्यवाह, विविध उपक्रम विभाग, महाराष्ट्र अंनिस, कोल्हापूर