
- दै चालु वार्ता
- प्रतिनिधी :द्रीनारायण घुगे
हिंदू जननायक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुक्रवारी ( दि.१४ जून २०२४) रोजी शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले.
महाराष्ट्र विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सदैव महाराष्ट्राच्या विकासासाठी आग्रही असणाऱ्या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याचा म्हणजेच हिंदू जननायक राज ठाकरे यांच्या जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्राभर मोठ्या उत्साहाने पार पाडला जात आहे याच धर्तीवर पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण शहरभर विविध कार्यक्रम घेण्यात आले.
मनसे पिंपरी चिंचवड उपशहराध्यक्ष *बाळा दानवले* व चिंचवड विधानसभा अध्यक्ष *मयूर चिंचवडे* यांच्या वतीने संत मोनीबाबा अनाथ आश्रम बिजलीनगर चिंचवड या ठिकाणी
दुपारी :-12 वाजता
मिठाईवाटप, अन्नदान, फळ वाटप बिस्किट वाटप तसेच त्यांच्याहस्ते केक कापण्याचा कार्यक्रम करण्यात आले.
*जयसिंग भाट* भोसरी विधानसभा संघटक यांच्यावतीने
श्री दादा महाराज नाटेकर मोरया ट्रस्ट वृद्धाश्रम छात्रालय चिखली येथे दुपारी 2 वाजता. लहान मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला व मुलांना फळे व शालेय साहित्य बिस्कीटचे पुडे देण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित होते.
हेमंत डांगे, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष महा. राज्य. बाळा दानवले, उपशहराध्यक्ष. रुपेश पटेकर, सचिव. मयूर चिंचवडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष. दत्ता देवतारासे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष. सीमा बेलापूरकर, महिला सेना अध्यक्ष. अनिता पांचाळ, उपशहर अध्यक्ष महिला. वैशाली बोत्रे, विभाग अध्यक्ष चिंचवड विधानसभा. जयसिंग भाट, संघटक भोसरी विधानसभा. नाथा शिंदे, उपविभाग अध्यक्ष पिंपरी विधानसभा. नितीन चव्हाण, उपविभाग अध्यक्ष पिंपरी. हर्षल गावडे, मयूर गवळी, दीपक बडेकर, अक्षय पारखे, इत्यादी. पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच मा. राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शहरावरती तीनही विधानसभा मिळून शहरात मोठा कार्यक्रमाचे नियोजन केलेले असून. पूर्ण शहरात वृक्षारोपणाचाही कार्यक्रमाचे नियोजन आहे.