*दैनिक चालू वार्ता अहमदपूर तालुका प्रतिनिधी
श्री हाणमंत जी सोमवारे
लातूर जिल्हा/ अहमदपूर
*कविता*
सुंदर विचारांची देणगी
माणूस वेळेवर हारतो किंवा वेळेवर जिंकतो असे कधीच होत नाहीं.परंतु जेव्हा वेळ बदलते तेव्हा मात्र आपल्या बरोबरच्यांचेच व्यवहार नक्की बदलतात हेच सत्य आहे
हार तेव्हा मुळीच होत नाही जेव्हा आपण कमी पडतो, परंतु जेव्हा आपण पुन्हा उठण्यासाठी नकार देतो तेव्हा आपला पराजय निश्चित असतो.पुन्हा पुन्हा निःशंक पणे उभे राहता आलेच पाहिजे
राग किंवा द्वेष तेव्हाच पुण्यवान बनला जातो जेव्हा तो धर्म , मर्यादा आणि सत्य यासाठी केला जातो परंतु सहनशीलता तेव्हाही पापच असते जेव्हा धर्माला , सत्याला आणि मर्यादेला वाचवू शकत नाही
ज्यांच्या जवळ तुमच्यासाठी वेळ नाही,त्यांना त्रास देऊ नका कारण ते आपल्या दुनियेत व्यस्त आहेत आणि त्या दुनियेत तुमची त्यांना नक्की जरुरत नाही.
अडचणींवर मात करताना न्याय नाही झाला तरी चालेल परंतु समाधान नक्कीच व्ह्ययला हवे कारण न्याय एकाच घरचा दिवा पेटवितो तर समाधान दोन्ही घरचे दिवे पेटवितो हेच त्रिकालबाधित सत्य आहे
जसे पाणी मुठीत पकडुन ठेवता येत नाही कारणं ते स्वतःचा मार्ग स्वतः बनविते अगदीं तसेच परिस्थिती नुसार जीवनात येणाऱ्या समस्या वर शांत पणें लक्ष द्या वेळेनुसार जीवन आपला मार्ग स्वतः बनविते एवढेच काय तर त्यात यशस्वी करून दाखविते.
गरजेचं नसते आयुष्य हवे तेवढे मिळावं परंतु जे आयुष्य आपल्याला मिळालं आहे त्याला मात्र जीवापाड जपावं. हीच खरी जीवनाची गंमत आहे.
संधी दार ठोठावते हे आता जुने झाले , सर्व अडथळ्यांची दारे तोडून संधी मिळवणे हे आता नवीन झाले. आलेल्या संकटाना घाबरायच नसत तर त्यांना हरवायच असते.
लेख/ कवी
श्री बाबाजी हुले , नवी मुंबई