
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर): देगलूर तालुक्यातील सर्व महसुल मंडळा पैकी काही मंडळात बऱ्या पैकी पेरण्यांना सुरूवात झाली आहे. मृग नक्षत्र लागल्या पासुन परिसरात अनेक भागात शेकडो हेक्टरवर सध्या कापुस आणि सोयाबीनची पेरणी झाली आहे. खरीप हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांनी जोरदार तयारी केली असून कडधान्याच्या पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.
देगलूर तालुक्यात अनेक ठिकाणी र सकाळपासूनच शेतकरी सोयाबीन व कापूस लागवड करतांना दिसून आले.
अनेक ठिकाणच्या कृषी केंद्र चालकांनी मागविलेल्या कापुस, सोयाबीन बियाणापैकी मोठ्या प्रमाणावर या बियाणांची शेतकऱ्यांनी उचल केल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदा सोयाबीन सह कापसाच्या उत्पादन क्षेत्रात परत वाढ होणार आहे. यंदा कृषीकेंद्र चालकांनी शहरासह ग्रामीण भागातील या खरीप हंगामाची जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक कल वाढला असून कडधान्याबाबत उदासिनता दिसून येत आहे. अद्याप तूर, उडीद, मूग व कडधान्यांच्या बियाणांची म्हणावी तशी उपलब्धता झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. काही ठिकाणी केवळ मूग बियाणेउपलब्ध असून कमी प्रमाणात तूर, उडीद बियाणे आलेली नाही अशी माहीती आहे. याबाबत केंद्राशी संपर्क साधला असता यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन वगळता कडधान्य बियाणांची मागणी केलेली नसल्याचा हा परिणाम असल्याचे ते म्हणाले अपवाद वगळता बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे घेतले आहे. दरवर्षी तालुक्यातील कृषी चालकांकडु तूर, उडीद, मूग या बियाणांची उपलब्धता होत होती. यंदा
कडधान्य कंपन्यांनी ठरल्या प्रमाणे बियाणे घेण्याची अट घातली आहे. दोन-तीन वर्षांमध्ये केवळ काही मोजक्याच टन बियाणांची उचलझाली होती.
त्यामुळे शिल्लक बियाणे परत
पाठवावे लागले होते. यंदा मोजक्याच शेतकऱ्यांनी कडधान्य बियाणाची मागणी केली आहे. सध्या या भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीला सुरुवात केली असून काही ठिकाणी पेरण्या झालेल्या असल्या तरी काही ठिकाणी मात्र अजुनही शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. यंदा या भागातील शेतकऱ्यांनी कडधान्य बियाणांची मागणी केलेली नाही. कंपन्यांनी किमान टार्गेट नुसार टन बियाणांची उचल करण्याची अट घातली आहे.
चौकटीतता
आता पर्यंत जवळपास ४० ते ४५ टक्के पेरण्या झाल्याचा अंदाज आहे. एक नंबरवर कापुस, दोनवर सोयाबीन आणि तीन नंबरवर मूग उडीद पीक सध्याच्या लावगडीत दिसत आहे. या नंतर मिरचीचे देखील क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांनी वेळोवेळी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पीकांवरील फवारण्या आणि तणनाशकांचा वापर करावा असे ;तालुका कृषी अधिकारी विकास नारनाळीकर यांनी सांगितले .