चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी-राजेंद्र पिसे
नातेपुते: येथील कन्या प्रशालेतील सभागृहात नवनिर्वाचित माढा लोकसभा संपर्कप्रमुख डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुका आढावा बैठक पार पडली
सदरची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सक्त आदेशानुसार घेण्यात आली.
दरम्यान पाटील बोलत होते,की संघटनात्मक बांधणी व पक्ष वाढीसाठी संघटन मजबुतीकरण करण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघचा दौरा केला असून येथून पुढे जे पदाधिकारी काम करतील तेच पदाधिकरी पदावर कार्यरत राहतील, जे पदाधिकारी काम करणार नाहीत त्यांना पदावरून बाजूला केले जाणार असल्याचे सांगत प्रेमाचा सल्ला दिला.
यावेळी माढा लोकसभा माजी संपर्कप्रमुख संजय कोकाटे,माळशिरस पंचायत समीती सभापती दत्ता मगर, जिल्हाप्रमुख महेश चिवटे,महिला आघाडीच्या आरतीताई बंसवती,तालुकाप्रमुख सतीश सपकाळ,जिल्हा उपप्रमुख दिपक खंडागळे,महादेव तुपसौंदर,अण्णासाहेब वाघमारे,विजय कोकणे,महेश पवार,हिरीभाऊ मगर,निखिल पलंगे,सुनील ढोबळे,शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख अर्जुन पिसाळ,रणजीत गायकवाड,पैगंबर मुलानी, शिवाजी होनमाने सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
