
म्हसळा – (रायगड)म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – एक हात मदतीचा ह्या सेवाभावी वृत्तीने म्हसळा तालुक्यात सामाजिक,शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात अग्रगण्य काम करीत असलेल्या रविप्रभा मित्र संस्था आणि सागवेकर फाउंडेशन मार्फत म्हसळा दुगवाडी येथील निवासी राजेश बांद्रे यांचा २४ वर्षीय चिरंजीव गणेश बांद्रे हा ८० टक्के गतीमंद आसुन त्याला गतिमान करण्यासाठी मोफत व्हीलचेअर भेट देण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष माजी सभापती
रविंद्र लाड,उपाध्यक्ष नरेश विचारे,पंचायत समिती विस्तार अधिकारी दिघीकर,प्रशासक अधिकारी हेमंत माळी,ग्रामसेवक योगेश पाटील,समाजसेवक कौसुभ करडे,संस्था सचिव संतोष उद्धरकर,खजिनदार सुशांत लाड,सदस्य समीर लांजेकर,संतोष घडशी,दत्तात्रय लटके,किशोर घुलघुले,गावप्रमुख धोंडु बांद्रे,अंगणवाडी सेविका अमिता कर्णिक,सेविका सानिका उध्दरकर,मदतनिस ऋतुजा बोरकर यांनी गतीमंद गणेश बांद्रे याच्या निवासस्थानी जाऊन पालक आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थीतीत गणेश यास व्हील चेअर हस्तांतरण केली.या वेळी गणेश याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता तर गणेश याची आईं आणि वडिलांचे डोळे भरून आले होते.म्हसळा नगरातील ग्रामीण भाग असलेल्या गरीब घटकातील दुर्गवाडी येथिल गतीमंद गणेश बांद्रे याला रविप्रभा मित्र संस्था आणि सागवेकर फाउंडेशन यांनी व्हिल चेअर हस्तांतरण करून सामाजिक सेवेतील महतकार्य केले असल्याने त्यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.