
दै चालु वार्ता प्रतिनिधी पुणे/पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
देहू*- येथील संत तुकाराम विद्यालय कै. शंकरराव ज्युनिअर कॉलेज व संत जिजाबाई कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
निरोगी शरीर व निरोगी मनासाठी योगा करणे गरजेचे आहे. योगामुळे मनाला शांती मिळते, शरीर लवचिक होते, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे मानसीक व शारीरिक आरोग्य सुधारते, मेंदूची क्षमता वृद्धिंगत होऊन स्मरणशक्ती सुधारते यासाठी किमान रोज तीस मिनिटे योगा करावा असा मोलाचा सल्ला योगशिक्षक विजय शेवकर यांनी दिला.
कार्यक्रमाची सुरुवात ओंकार आणि गुरुवंदने नी झाली. योग शिक्षिका सुषमा पवार व योगशिक्षक गणेश टिळेकर यांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगाची प्रात्यक्षिक करून घेतली. योगा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी भश्रिका कपालभाती, भ्रामरी, अनुलोम विलोम हे श्वसनाचे व्यायाम प्रकाराचे धडे घेतले.
योग शरीराला बळकट करते तर श्वसनाच्या व्यायामामुळे मन बळकट होते. असे विचार क्रीडा प्रमुख सचिन दळवी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी नगरसेवक गणेश हगवणे, गणेश गायकवाड, सुषमा पवार ,सौरभ कंद, गणेश टिळेकर, विजय शिवकर, संत तुकाराम विद्यालयाचे प्राचार्य बालाजी पुजारी, संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर ,इंग्लिश मीडियम च्या मुख्याध्यापिका अश्विनी चौरे, उप मुख्याध्यापिका विद्या कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील घुमटकर यांनी केले. वंदना गवारी यांनी आभार मानले