
जालना प्रतिनिधी आकाश माने
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी आंदोलन आणि उपोषण केलं आहे. तसेच दोन्ही समाजाच्या उपोषणकर्त्यांनी सरकारविरोधात भूमिका घेतली आहे.
*“ओबीसी समाजाचे आंदोलन आणि उपोषण हे सरकार पुरस्कृत”*
मनोज जरांगे पाटील हे ओबीसी समाजाचे आंदोलन आणि उपोषण हे सरकार पुरस्कृत असल्याचं म्हणाले होते. तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी सरकार इतर लोकांच्या आरक्षणावर कार्पेट टाकत असल्याचं वक्तव्य केलं होतं. याचपार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही समाजावर भाष्य केलं आहे.
ओबीसी आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. ते म्हणाले की, या माध्यमातून त्यांना दंगल घडवायची आहे. पण हा डाव सरकार यशस्वी होऊ देणार नाही. गावगाड्यातील एकाही मराठा आणि ओबीसी समाजाच्या लोकांवर हात पडून देणार नाही.
मी एक पाऊल मागे घेईल मात्र सरकारला कोणत्याही परिस्थितीत सरकारला जिंकू देणार नाही. जर 13 तारखेला दिलेलं आश्वासन पाळलं नाहीतर सरकार बुडवणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. कुठेही कायद्याच्या चौकटीत राहून दोन समाजात आमचा तेढ निर्माण होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. ना ओबीसी ना मराठा कोणाचंही अहित होऊ नये. सरकार कोणाचंही अहित करण्याच्या मार्गावर नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
ओबीसींच्या शिष्टमंडळात कोण?*
दरम्यान ओबीसींच्या शिष्टमंडळांमध्ये मंत्री गिरीश महाजन उदय सामंत आणि अतुल सावे हे मुंबईला शिष्टमंडळाकडून येणार आहेत. तर त्याठिकाणी लक्ष्मण हाकेंचे देखील शिष्टमंडळ आहे. अशातच आता ओबीसी शिष्टमंडळामध्ये छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि प्रकाश शेंडगे यांचा ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळात समावेश आहे