
दै. चालु वार्ता रोहा प्रतिनिधी अजय परदेशी
कोलाड येथील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय गोवे – कोलाड येथील हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत अमलपुरे यांना या वर्षीचा हिंदी लघुकथा रत्न सन्मान नेपाळ सरकार पांजिकृत संस्था शब्द प्रतिभा बहुक्षेत्रिय फाऊंडेशन येथून दि. ५ जून २०२४ रोजी प्रदान करण्यात आला या पुरस्कारामध्ये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्राचा समावेश असून ऐतीहासिक क्षेत्र लुंबिनी येथे हा सन्मान सोहळा पार पडला होता डॉ. सूर्यकांत अमलपुरे हे गेली १५ वर्षापासून डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात हिंदी विषयाचे अध्यापन कार्य करत आहेत त्यांचे ३ पुस्तके प्रकाशित असून ५ पुस्तकांचे प्रकाशन कार्य चालु आहे १ काव्यसंग्रह प्रकाशित असून २ कव्य संग्रहाचे प्रकाशन कार्य चालु आहे ६० शोध निबंध राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे व ५० चर्चा सत्रात सहभागी झाले आहेत २०१८-१९ मध्ये मुंबई विद्यापीठ कडून मायनर रिसर्च साठी २८ प्रचार प्रसार संस्थांचे ते सदस्य व कार्यकरनिवर कामकाज पाहतात आता पर्यंत त्यांना ६० पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यांच्या या मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे सचिव माननीय संदीप तटकरे सर्व संस्थेचे पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास देशमुख व उप प्राचार्य नेहल प्रधान सर्व प्राध्यापक वर्गानी तसेच पंचक्रोशीतील सर्व प्राध्यापकाने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..