
दै चालु वार्ता प्रतिनिधी पुणे/पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
ग्रामपंचायत माळवाडी तालुका मावळ जिल्हा पुणे संस्थेचा ४३ वा वर्धापनदिन ग्रामपंचायत कार्यालायास विद्युत रोषणाई करून व गावातील सर्व आजी – माझी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व पदाधिकारी, विविध पतसंस्थांचे सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ, युवा नेते, युवा कार्यकर्ते / कार्यकर्त्या माळवाडी गावातील ग्रामस्थ बंधू व भगिनी या सर्वांच्या हस्ते कार्यालयाच्या परिसरात ग्रामपंचायत माळवाडी व आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था यांच्या वतीने वृक्षलागवड करून सर्वांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. .*
माळवाडी ग्रामपंचायत हि १९८१ सारी स्थापन करण्यात आली या माळवाडी ग्रामपंचायत दि २७ रोजी ४३ वा वर्धापन दिनानिमित्त वृक्ष लागवड करत आहे
माळवाडी ग्रामपंचायत आज पर्यंत गावात नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी आरओचए फिल्टर वाटर एटीएम मशीन बसविण्यात आले आहे त्या बरोबर गावातील रस्ते वा
लाईट नळयोजना कचराकुंडीत कचरा गाडी सेवा . मागील काही वर्षांपासून पासून दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सत्कार दरवर्षी प्रमाणे यंदाही करण्यात आला विविध प्रकारच्या सुविधा सुव्यवस्था करण्यात आले असे
सरपंच पल्लवी ताई दाभाडे यांनी सांगितले आहे
यावेळी सरपंच पल्लवी दाभाडे उपसरपंच पुजा दाभाडे सचिव खोमणे सदस्य मनिषा दाभाडे पल्लवी मराठे जयाताई गोटे पुनम अल्लाट रेश्मा दाभाडे विधुर पचपिंड सुधिर अल्लाट सचिन शेळके ग्रामस्थांच्या वतीने श्री रोहिदास मराठे यांनी ग्रामपंचायतिची स्थापना ते आज पर्यंत गावाचा झालेला विकास याविषयी सर्वांना थोडक्यात माहिती सांगितली व आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्री सुनिल नाना भोंगाडे (मा. उपसरपंच) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तद नंतर विद्यमान सरपंच सौ पल्लवी संदीप दाभाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
व शेवटी श्री दिपक दाभाडे (मा. उपसरपंच) विद्यमान सदस्य यांनी ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.