
दै चालु वार्ता प्रतिनिधी पुणे/पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेमार्फत तसेच ईपीएस वर्ल्डवाईड ,ओम साई चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनी मधील खडक पाडा येथील शंभर मुलांना शालेय बॅग चे वाटप करण्यात आले
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अभिनेत्री हेमा शर्मा ,गायक निर्मल गुलेरिया, सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे , राधिका गुलेरिया, मंगला शिंदे ,राधिका गुलेरिया, राजेश दुबे , हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
यावेळी आदिवासी मुलांच्या मनोरंजनासाठी गायक निर्मल गुलेरिया यांनी गाण्याची मैफिल जमवून मुलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम पार पाडला .
अभिनेत्री हेमा शर्मा यांनी मुलांसोबत गप्पा मारल्या तेथील समस्या जाणून घेतल्या मुलांना खूप शिका मोठे व्हा हा कानमंत्र दिला
यावेळी पाड्यातील मुलांसाठी व मुलांच्या पालकांसाठी भोजनाचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला. मुलांनी मनसोक्त भोजनाचा आस्वाद घेतला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ सुनीता नागरे यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले
तसेच मुंबई शहराचे अध्यक्ष सुरज विश्वकर्मा संस्थेचे समन्वयक मधु कुमार राठी, पाड्यातील कार्यकर्त्या सौ वनिता सुतार प्रसाद मराठे यांनी अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले. आणि पुढेही आमच्या संस्थेच्या सामाजिक कामांमध्ये आपला मोलाचा सहभाग असावा अशी आशा व्यक्त केली
दहा वर्षांपूर्वी आम्ही एक बीज लावले होते आज त्या बीजाचा मोठा वटवृक्ष झाला आणि साडेचार हजार आदिवासी मुलांना शैक्षणिक सावली देण्याचं काम हा वटवृक्ष करत आहे .
आज खरच आम्हाला खूप आनंद होत आहे की या वटवृक्षा सोबत अनेक छोट्या वेली जोडल्या आहेत आणि ह्या वेली अनेक मुलांना सावली देण्याचे काम करत आहे असे यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ सुनीता नागरे बोलत होत्या
आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्ही पाड्या तांड्या वरील मुलांपर्यंत पोहोचवून त्यांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करत असल्याचे समाधान आम्हा सर्वांना आहे