
दै चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे :
देहूगावचा सुपुत्र राष्ट्रीय पंच पुणे जगनाथ क्रीडा मंडळ धनकवडी यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी मुंबई यांच्या वतीने दर वर्षी दिला जाणारा , जेष्ठ पंच पुरस्कार , या पुरस्कारासाठी देहूगावचे कबड्डी पट्टू, जेष्ठ पंच नंदकुमार धोंडिबा काळोखे यांची निवड करण्यात आली आहे.
नंदकुमार काळोखे यांचे एम.डी.शारीरिक शिक्षण झाले असून ते माजी मुख्याध्यापक आहेत.त्यांना शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असून ,आज पर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.त्यांनी आपल्या या कारकिर्दीत अनेक खेळाडू घडविले आहेत.शिवाय अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत.ते लेझीम ,झांज यांचे तज्ञ मार्गदर्शक असून या बाबतीत त्यांनी चेन्नई ,गोवा ,दिल्ली या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन केले आहे.१९४४ सालापासून ४४ वर्षे पंच ,म्हणून अविरतपणे काम चालू आहे.त्या निमित्त शालेय ,जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशियशन च्या वतीने १५ जुलै हा कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकराव ( बुवा ) यांचा जन्म दिवस *कबड्डीदिन* म्हणून प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो.या निमित्ताने किशोर कुमार व खुला गट राष्ट्रीय स्पर्धेत राज्य संघातून खेळताना विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या उत्कृष्ट खेळाडूंचा शिष्यवृत्ती ,पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. तसेच कबड्डी क्षेत्रातील जेष्ठ कार्यकर्ता ,जेष्ठ पंच, जेष्ठ खेळाडू, सातत्यपूर्ण स्पर्धा आयोजक , संस्था यांचा गौरव करण्यात येतो.
यंदा जेष्ठ पंच या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून जेष्ठ पंच नंदकुमार काळोखे यांच्यासह आठ जेष्ठ पंचाची निवड करण्यात आली असून ,येत्या १५ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य कबड्डी अशोसीएनचे अध्यक्ष आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या २४ व्या कबड्डीदिनी ,म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल मध्ये अमृत कलश देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.