
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
अशोकराव उपाध्ये / कारंजा लाड:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची निःशुल्क नोंदणी करण्याची व्यवस्था कारंजा पक्ष कार्यालयात करण्यात आली असून दि.०८ जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले .
आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, युवा नेते देवव्रत डहाके, प्रदेश उपाध्यक्षओबीसी सेलचे राजू गुल्हाने ,प्रदेश सरचिटणीस कृष्णकुमार राठोड, माजी सभापती जयकीसन राठोड, पंचायत समितीचे सभापती प्रदीप देशमुख,प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल मो. काशीफ, कृ.उ.बा.समिती संचालक बालचंद जाधव, संचालक खविस खेमराज चव्हाण, छगन बहाळे, जीप .सदस्य चंद्रकांत डोईफोडे, शहराध्यक्ष अजय श्रीवास, नगर सेवक सलीम गारवे, जाकीर शेख, अब्दुल एजाज, युनूस पहिलवान, अब्दुल राशिद, जावेदोद्दीन शेख, नितीन गढवाले, इरफान खान, डॉ. अविष दरेकर, नदीम राज, शकील नौरंगाबादी, रज्जाक फाकिरावाले, कय्युम जट्टावाले, रज्जाक खेतीवाले यांच्यासह माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी उपस्थित होते. वृत्त असे की महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. त्या अंतर्गत महिलांना प्रति माह १५०० रुपये आर्थिक मदत मिळणार आहे.या योजनेचा लाभ प्रत्येक महिलाना मिळावा तसेच लाभार्थीना अर्ज करतांना त्रास होऊ नये या करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात कारंजा येथे दि. ८ जुलै २०२४ ते ३१ ऑगस्ट २०१४ पर्यंत सकाळी १०:०० ते दुपारी ४ वाजे पर्यंत निःशुल्क नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या मध्ये ५ काउंटर लावण्यात आले आहे. महिलांना नोंदणी करतांना बसण्याची व्यवस्था कार्यालयात करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे संचालन हमीद शेख यांनी केले तर आभार ॲड. फिरोज शेकुवाले यांनी केले