दै चालु वार्ता प्रतिनिधी पुणे/पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
या ठिकाणी दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली जात आहे.ही शाब्बासकीची थाप त्यांना ऊर्जा देणारी आहे.विद्यार्थ्यांच्या मध्ये आत्मविश्वास चिकाटी आणि अभ्यासात सातत्य असेल तर यश हमकास मिळते.अशाचा विध्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव केला जात आहे.पालकांनी देखील मुलांच्या आभासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.मुलांनी शिक्षण घेताना आपल्या परिस्थितीचा देखील विचार करावा ,मला हेच पाहिजे तेच पाहिजे असा हट्ट धरू नये.आहे त्यात समाधान मानून चिकाटी आणि जिद्दीने अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच यशाचे शिखर गाठू शकता.दहावी बारावीत
गुण कमी मिळाले तर खचून न जाता आपण कशात कमी पडलो या बाबत विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करावे , आणि अभ्यासात सातत्य ठेवावे अगदी ४५ टक्याचे ९५ टक्के होण्यास वेळ लागणार नाही.
*विजय वाघमारे*
*वरिष्ठ पोलिस निरीक्षक ,देहूरोड पोलिस स्टेशन*
शाहू फुले आंबेडकर विचार मंच ,आणि रमाई महिला बचत गट यांच्या वतीने ,इयत्ता दहावी बारावीतील गुणवंत विध्यार्थ्यांचा गौरव चिन्ह सन्मान ,सफाई कामगार महिलांना रेनकोट वाटप,बांधकाम कामगारांना ओळखपत्र ,रेशनिंग कार्डचे वाटप ,आणि विवाहास पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या जोडप्यांचा सन्मान , देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे ,किशनचंद्र खंडेलवाल ( प्राचार्य जे.एस.पी.एम.कॉलेज )
बाळासाहेब गायकवाड* ( उधोजक ) कैलास कदम ( अध्यक्ष ,काँग्रेस आय ,पिं. चिं.) मानव कांबळे ( जेष्ठ विचारवंत ) यांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह शाल श्रीफळ ,गौरव चिन्ह ,शालेय साहित्य आणि एक वृक्षांचे रोपटं देऊन गौरव करण्यात आला.*
यावेळी देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे नगरसेवक गोपाळ तंतरपाळे ,पिंपरी चिंचववडचे माजी नगरसेवक बाळासाहेत तरस , निलेस तरस ( शिवसेना शहर प्रमुख पिं. चिं ) बाप्पूसाहेब कातळे ( उपाध्यक्ष राष्ट्रवादी पिं. चिं.) राजेंद्र तरस ( युवा सेना प्रमुख ) बाळासाहेब धावारे, नवनाथ तरस , दिलीप कडलक ,शुभांगी वानखेडे ,तसेच पालक ,ग्रामस्थ उपस्थित होते.
भारतरत्न हौसिंग सोसायटी विकास नगर येथे रविवार ( ता.७ ) रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन शाहू फुले विचार मंच चे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे आणि रमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा सिंधू तंतरपाळे यांनी केले होते.
