अशोकराव उपाध्ये / कारंजा लाड:
विद्यार्थी जीवन जगत असताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांनी आलेल्या अडचणींवर मात करून त्यामध्ये संधी शोधावी आणि आपल्या पुढील ध्येयाकडे लक्ष केंद्रित करून, त्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावे व आपल्या अंतिम ध्येयाकडे वाटचाल करावी,असे प्रतिपादन कि.न. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.विनय कोडापे यांनी केले.आदिशक्ती संस्थेद्वारा आयोजित विद्याश्री शिष्यवृती वाटप कार्यक्रमामध्ये अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आदिशक्ती महिला बहुऊदेशीय संस्था वाल्हई या सामाजिक संस्थेचा विद्याश्री योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याच्या वाटपाचा कार्यक्रम दिनांक ७ जुलै रोजी कारंजा नागरी पतसंस्थेच्या सभागृहात पार पडला.यावेळी अध्यक्षस्थानी कि..न महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.विनय कोडापे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामिण रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधिक्षक डॉ. यशवंत टेकाडे, सर्पविज्ञान तज्ञ डॉ.राजा गोरे, विधिज्ञ निलेश बोरकर,
पुरस्कार प्राप्त अजय मोटघरे, डॉक्टर मनिष राऊत, स्थापत्य अभियंता अजय राऊत,प्राचार्य डी. आर रोतेले,मुख्याध्यापक पुरुषोत्तम म्हातारमारे, प्राध्यापक निर्मल ठाकुर, आदिशक्ती संस्थेच्या सौं. मृणाली तोमर इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविकात प्रा. निर्मल ठाकूर यांनी केले .विद्याश्री योजनेच्या दशकपुर्ती बद्दल दात्यांचे आभार त्यांनी व्यक्त केले.यावेळी वड़गाव रंगे येथील बी बी ए ला टॉपर संदेश गलबले व बी कॉम ला टॉपर असलेली पसरणी ची कु.अंकिता पोटपिटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवारांनी आपले मनोगत व्यक्त केले. अडचणींवर मात करून ध्येय आत्मविश्वासने गाठा असे डॉ.राजा गोरे मनोगतात म्हणाले.
शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम असल्याचे डॉ यशवंत टेकाडे म्हणाले ऍड.निलेश बोरकर यांनी प्रेरणादायी प्रसंग कथन केले .अध्यक्षीय भाषणात डॉ.विनय कोडापे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी सतात प्रयत्नशील राहावे,आलेल्या समस्येवर मात करून त्यामध्ये संधी शोधावी.यावेळी 81 विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी लागणारे शालेय साहित्य ;स्कूल बैग, लेखन साहित्य,पाणी बॉटल, पाठयपुस्तकं, रजिस्टर देण्यात आले. यामध्ये कोविड काळात सेवाकार्य करतांना बळी पडलेल्या पालकांच्या पाल्यांना मदत करून संस्थेने आपली सामाजिक बांधीलकी जपली. कार्यक्रमाचे संचलन हेमंत पापळे यांनी तर आभार प्रदर्शन विजय भड यांनी केले.
