दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी नांदेड दक्षिण गोविंद मोरे
नांदेड वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविध्यालय नेहरूनगर येथील चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी कृषीदूत तेवर अरुण, तांदळे ओमकेश, ठिकरे तुषार, तोगरगे आदर्श, टेकाळे श्रीकांत यांच्या कडुन इमामवाडी येथे कृषीदिनानिमित्त ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत शेतक-यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी त्यांनी अधुनिक शेती पद्धती, बदलते हवामान, कीडरोग व्यवस्थापन, सुक्ष्म सिंचन पद्धती शासकीय योजना व सेंद्रिय शेती बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध पोस्टर (प्रतिकृती) दाखवून शेतकऱ्यांना समजावून सांगितले तसेच त्यांनी वृक्ष लागवड आणि जनावरांचे लसीकरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी गावाचे सरपंच शाहुताई सुनिल कांबळे, शाळेचे प्राचार्य बोधगिरे मॅडम, पोलिस पाटील हरी बरफुले सर, शिक्षक शिंदे सर आणि ग्रामस्थ शेतकरी उपस्थीत होते. वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय नेहरूनगर कंधार चे मा. प्राचार्य डी.जी मोरे सर. प्रा. बंडेवार सर, प्रा. बसवंते सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले
