
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
धाराशिव/भूम- कृषि विभाग व धाराशिव आत्मा मार्फत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत भूम येथे दि.29 रोजी तालुक्याचा रानभाजी महोत्सव संपन्न झाला.कार्यक्रमाचे उद्घाटक गौरीप्रसाद हिरामेठ, उपविभागीय पोलीस अधिकारी भूम,श्रीमती सुरेखा श्रीकांत शेळके ( श्री स्वामी समर्थ केंद्र),भास्कर शिवाजी वारे, प्रगतशील शेतकरी, चिंचोली,विवेक गुडूप, तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, एस.सी.ओहाळ, दुय्यम निबंधक श्रेणी 1, अतुल ढवळे, तालुका कृषी अधिकारी, भूम,बारकुल, सहाय्यक निबंधक, भूम,महेश बिडवे, विस्तार अधिकारी (कृषी) पंचायत समिती भूम,तसेच सर्व मंडळ कृषि अधिकारी,कृषि पर्यवेक्षक,कृषि सहाय्यक, कृषि सेवक, आत्मा तालुका तंत्र व्यवस्थापक, समुह सहाय्यक यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.पाऊस सुरू झाला की रानमळावर गवत उगवायला लागते, झाडेझुडपे फुला, पानांनी बहरायला लागतात.अगदी त्याच वेळी रानभाज्या, रानफळे सुद्धा निसर्गाचे एक वरदान म्हणून आपल्यासाठी उपलब्ध होतात परंतु नागरिकांना अशा रानभाज्यांची ओळख व माहिती नसल्यामुळे त्यांचा आहारात उपयोग करण्यात येत नाही. त्यामुळे अशा रानभाज्यांची ओळख, औषधी गुणधर्म, महत्त्व व वापर यांची माहिती होण्यासाठी अशा रानभाजी महोत्सवाचा चांगला फायदा होऊ शकतो.महोत्सवात भूम तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच श्री स्वामी समर्थ केंद्र, भूम यांच्या महिला प्रतिनिधींनी करटुले, बांबू, अंबाडी, गुळवेल, हादगा,आघाडा, फांजी, काठेमाठ,पाथरी,शेवगा, आळू,चिघळ, घोळ, तरवट, कुरडू,तराटा,उंबर अशा जवळजवळ 35 प्रकारच्या रानभाज्या महोत्सवात आणल्या होत्या. तसेच आळू,शेवगा, तांदूळसा पाथरी यापासून तयार केलेल्या पुरी,वड्या,भाज्या या रेसिपीज ठेवण्यात आलेल्या होत्या.प्रत्येक रानभाजी सोबत त्यांची ओळख, उपयोग, पाककृती सांगणारे माहिती पत्र जोडण्यात आले होते.
भूम शहरातील व परिसरातील भरपूर नागरिकांनी या महोत्सवास भेट देऊन रानभाज्या बद्दल माहिती करून घेतली.
तसेच रविंद हायस्कुल,भूम चे 9 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी महोत्सवास भेट दिली व रानभाज्या बद्दल ची माहिती श्री.खटाळ ए.डी.कृषि सहाय्यक यांचे कडून जाणून घेतली.