
दै.चालु वार्ता,
लातूर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन संपन्न झाला.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक अरुण पत्की प्रमुख पाहुण्या अनिता येलमटे, मुख्याध्यापक अनंतराम कोपले, पर्यवेक्षक कृष्णा मारावार, किरण नेमट, अभ्यास पूरक मंडळ प्रमुख आशा गौतम उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या अनिता येलमटे यांनी माहितीचा अधिकार हक्क व कर्तव्य यासंदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात अरुण पत्की यांनी जागतिक माहिती अधिकार या दिनाचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित मुळे व रितेश चव्हाण या विद्यार्थ्यांनी केले तर आभार रवी चव्हाण या विद्यार्थ्यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.