
दैनिक चालू वार्ता
दौंड – प्रतिनिधी प्रवीण पवार
दौंड दि.१६ – राज्यात निवडणूका जाहीर होताच दौंड पोलीस ठाणे जाहीर आवाहन करण्यात आले दौंड पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना याद्वारे कळवण्यात येते की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने दि.१५/१०/२०२४ पासून ते दि. २५/११/२०२४ रोजी पावेतो आदर्श आचारसंहिता अंमलात असून पुणे जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे मतदान दि.२०/११/२०२४ रोजी व निकाल दिनांक २३/११/२०२४ रोजी जाहीर होणार आहेतरी कोणीही नागरिक सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या, वंशाच्या, समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या व वर्णाच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करू नयेत तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे वाजवणार नाहीत, फटाके फोडणार नाहीत. रंग, गुलाल उधळणार नाही. संबंधित विभागाच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत. व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक १५/१०/२०२४ ते दिनांक २५/११/२०२४ या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये ओन्ली एडमिन करून बदल करून घ्यावा जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाहीत, जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.गोपाळ पवार,पोलिस निरीक्षक दौंड ,पांडुरंग थोरात, गोपनीय विभाग यांनी आवाहन केले