
दै.चालु वार्ता,उदगीर,प्रतिनिधी – अविनाश देवकते
उदगीर : श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, योगगुरु रामचंद्र गरड, संतोष चामले, विलास शिंदे हे उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे योगगुरु रामचंद्र गरड आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, डॉ . ए पी जे अब्दुल कलाम यांनी आपले आयुष्य मातृभूमीसाठी समर्पित केले. भारताला एक मजबूत व सक्षम राष्ट्र बनवण्यात त्यांघे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली प्राण घातक अग्नी , पृथ्वी, आकाश आणि नाग क्षेपणास्त्रे राष्ट्रीय शस्त्रगारात जोडली गेली .
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांचे विचार आत्मसात करावेत.विद्यार्थी विक्रांत स्वामी, अमरजित भोपी, व्यंकटेश मुंडे, संस्कार शेळके, आदित्य वायबासे, रेवणनाथ मनसटवाड, कृष्णा मोगरगे ,आर्यन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी केले तर आभार पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश पंगू, श्रीकांत देवणीकर, संतोष चामले, मारोती मारकवाड, गोविंद डिगोळे, सुधीर गायकवाड यांनी सहकार्य केले.