
दै चालु वार्ता
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बद्रीनारायण घुगे
दरवर्षीप्रमाणे पोदार इंटरनॅशनल स्कूल चाकण शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा दिनांक 15/ 10/ 2024 रोजी ग.दि.माडगूळकर नाट्यगृह, बिजलीनगर, चिंचवड येथे दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाला पालक शिक्षक विद्यार्थी आणि मान्यवरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. वार्षिक स्नेहसंमेलनाचा विषय , ‘हनुमान की वीर गाथा,’ हा होता. तीन विभागांमध्ये या कार्यक्रमाचे प्रस्तुतीकरण करण्यात आले.
इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीरामाचे व हनुमानाचे बालपण , इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीरामाचा वनवास आणि हनुमानाला होणारा शक्तीचा बोध तसेच, इयत्ता आठवी , नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी लंका दहन रावण आणि रामाचे अयोध्या पुनरागमन इत्यादी दृश्यांचे नाट्यंकन सादर केले .
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शाळेच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली . सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हणून मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर स्वागत नृत्याचे प्रस्तुतीकरण झाले. सांस्कृतिक कार्यक्रमांना विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांचे मन जिंकले. नृत्य नाटिका गायन यांसारख्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला.
आसमा को छूकर देखा , अकडम पकडम , सेल्फी लेले रे , हनुमान चालीसा इत्यादी नृत्यांनचे सादरीकरण केले. तसेच आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नाटकांकन या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले . या कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील क्रीडा स्पर्धा आणि शिक्षण क्षेत्रात असलेल्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव देखील करण्यात आला. तसेच शाळेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचाही गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या विषयासंदर्भात बोलताना शाळेच्या प्राचार्या श्रीमती सिमरन कौर म्हणाल्या, ,की ‘प्रभू श्रीराम यांसारख्या पुरातन नायकांच्या अंगी असणारे गुण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात यावे’ हाच उद्देश या वार्षिक स्नेहसंमेलनाचा होता.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की , ‘रामायण महाभारतासारखी महाकाव्ये आपल्या भारत देशाचा सांस्कृतिक ठेवा आहे , आपल्या पुराण पुरुषांचे गुण विद्यार्थी स्नेहसंमेलनात होणाऱ्या नाटकांद्वारे आत्मसात करतात. हे गुण आत्मसात करणे यापेक्षा चांगले अनुभवजन्य ज्ञान एक्सपिरिएशनल लर्निंग कोणते असू शकेल’ असा प्रश्न त्यांनी पालकांना केला. तसेच , भारतीय संस्कृतीतील एक कुटुंब पद्धतीचे महत्त्व विशद केले.
प्राचार्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी एक चांगले नागरिक व्हावे असे आवाहन केले . इयत्ता चौथी ते सहावीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून Edudrone संस्थेच्या व्यवस्थापिका आणि निर्मात्या डॉक्टर काजल छतिजा तसेच , कर्नल समीर कुलकर्णी सर त्याचप्रमाणे , पुणे विभागातील पोद्दार शाळेच्या चिंचवड ,वाकड ,सारा सिटी आणि पोद्दार ब्लॉसम या शाळांच्या मुख्याध्यापिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
संध्याकाळी इयत्ता आठवी ते दहावीच्या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे पुणे विभागातील पोदार विद्यालयाचे तळेगाव आणि हडपसर येथील शाळांचे मुख्याध्यापक तसेच , नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेडकर सर त्याचप्रमाणे, मोटिवेशनल स्पीकर करणार कुलकर्णी सर आणि त्यांच्या सौभाग्यवती Advocate मेघा कुलकर्णी मॅम यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपप्राचार्य श्रीमती. गोमती कौशिक मॅम व श्री. गणेश ब्रम्हे सर यांनी केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनीही सूत्रसंचालनात सहभाग घेतला. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी एकत्र येऊन हा आनंद साजरा केला. या सोहळ्याने विद्यार्थ्यांना नव्या ऊर्जेची प्रेरणा दिली.