
दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी- विजयकुमार चिंतावार
भोकर / नांदेड:-
महाराष्ट्र विधानसभेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पहिली यादी जाहीर केलेली असून त्या यादीमध्ये (८५) भोकर विधानसभा मतदारसंघाकरीता युवा नेतृत्व तिरुपती ऊर्फ पप्पू बाबुराव कदम कोंढेकर यांना अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेस पक्ष श्रेष्ठी कडून घोषीत करण्यात आले आहे.
भावी आमदार म्हणून अनेक जण इच्छुक असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची उमेदवारी नेमकी कोणाला मिळेल याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते. भोकर विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कन्या सुश्री श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांना भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी देण्यात आली असल्याने त्यांच्याविरोधात आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून कोणता तगडा उमेदवार मिळेल याची उत्सुकता शिगेला पोहचलेली असताना आज दि. २४ ऑक्टोबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पहिली यादी जाहीर केली असून त्यात युवा नेते अशी ओळख असणारे व सर्वसामान्यांसोबत नाळ जोडून असलेले युवा नेतृत्व तिरुपती ऊर्फ पप्पू बाबुराव कदम कोंढेकर यांना उमेदवारी जाहीर होताच भोकर विधानसभा मतदारसंघात ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. कोंडेकर यांच्या उमेदवारीमुळे आता लढतीत खरी रंगत येणार असल्याचे चित्र आहे. सोशल मीडियावर निष्टवंताला न्याय मिळाला, आता ईतिहास घडणार.. अशा पोस्ट व्हायरल होण्यास सुरुवात झालेले आहेत. एकूणच पप्पू कोंडेकर यांच्या उमेदवारीमुळे प्रस्थापित पक्षाला धक्का बसला आहे. येणाऱ्या काळात पप्पू कोंडेकरांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस भा.ज.पा. अशी सरळ लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहेत.