
शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना पाथरी मतदारसंघातून उमेदवारी ने मिळाल्याने साधारण 500 पदाधिकाऱ्यांसह आपले राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले आहेत. महायुतीमध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने सर्वच शिवसैनिक नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
सईद खानांसहित पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे
शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष सईद खान यांच्यासह पदाधिकारी, जिल्हाधिकारी, तालुकाप्रमुख आणि शहरप्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्याने जवळपास ५०० जणांनी आपले सामुहिक राजिनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सुपूर्द केले आहेत.
29 ऑक्टोबरला माझा अर्ज मी भरणार आहे, असं सईद खान यांनी सांगितलं आहे. सईद खान हे शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. २९ तारखेला महादेव जानकर यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.