
दीड ते दोन हजार कोटींचा निधी आणण्यासाठी मनगटात जोर लागतो! चमकोगिरीला बळी न पडता विकासाला मतदान करा :- प्रा.डॉ. तानाजीराव सावंत
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
धाराशिव/भूम:-महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.भूम परंडा वाशी येथील शिवसैनिक,पदाधिकारी तसेच महायुतीतील सर्वच नेते उपस्थित होते.2019 च्या निवडणुकीत भूम येथील सभेत तानाजीराव सावंत यांनी वाशी भूम परंडा मतदारसंघात मराठावड्याच्या हक्काचे 21 टीएमसी पाणी आणल्याशिवाय पाय ठेवणार नाही.त्याची आठवण करून देताना येत्या उजनी’चे पाणी गुढीपाडव्यापर्यंत सीना कोळेगाव धरणामध्ये आणणार,उपसा सिंचन योजनांची स्थापना करून त्यांचे पुढील पाच वर्षाचे वीज बिल भैरवनाथ कारखाना भरणार असून धाराशिव जिल्ह्याचे हक्काचे सात टीएमसी पाणी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना वाशी भूम परंडा मतदारसंघात दीड ते दोन हजार कोटी रुपयाचा महाराष्ट्रात सर्वाधिक निधी विविध विकास कामासाठी आणल्याचे सांगितले. तसेच विरोधकावर टीका करताना दीड हजार कोटी वर किती शून्य आहेत याचा अभ्यास करावा आणि नंतर विकास कामाच्या गप्पा मारावा अशी माजी आमदार राहुल मोटे त्यांच्यावर नाव न घेता टीका करण्यात आली. वाशी भूम परंडा प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल मध्ये 35 ते 40 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगताना वाशी आणि साठी एमआयडीसी आणल्याचे सांगितले. या एमआयडीसी मध्ये येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव मिळावा दुधाला भाव मिळावा यासाठी सोयाबीन प्रक्रिया उद्योग तसेच दुधासाठी पाच लाख लिटरचा मोठा प्लांट उभा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यामुळे या मतदारसंघातील हजारो तरुणांना उद्योग, नोकरी मिळणार असल्याचे सांगितले. शिवजल क्रांतीच्या माध्यमातून सातशे किलोमीटर नाला नदी खोलीकरण केले यामुळे या भागातील पाण्याचे पातळी वाढून शेतकऱ्यांना पाणी देण्यास उपलब्ध झाले. हा आमदार तानाजी सावंत तुमचा सेवक म्हणून वाशी भूम परंडा मतदारसंघासाठी यापुढे तिपटीने निधी आणणार असून हा भाग सुजलाम् सुफलाम् केल्याशिवाय राहणार नाही,यावेळी बोलताना त्यांनी हा उपस्थित जनसमुदाय सांगतोय गुलाल आपलाच असणार एक लाखाच्या पुढे निवडून येणार आणि 23 तारखेला गुलाल घेऊन या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.सभेला गिरीराज सावंत, धनंजय सावंत,केशव सावंत,दत्ता साळुंके,गौतम लटके, संजय गाढवे, सुभाष सिद्धीवाल,रामचंद्र घोगरे,बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर,दत्ता मोहिते,अण्णासाहेब देशमुख,जाकीर सौदागर,शिवाजी भोईटे,उद्धव साळवी,नवनाथ जगताप, ज्ञानेश्वर गीते,नागाजी बापू नाईकवाडी, राहुल डोके,बाळासाहेब मांगले,बालाजी गुंजाळ,प्रवीण देशमुख,युवराज हुंबे, प्रभाकर शेंडगे,समाधान सातव,विशाल ढगे,निलेश शेळवणे,निलेश चव्हाण,युवराज तांबे, मुकेश भगत, पांडूरंग धस आदी महायुती पक्षाचे कार्यकर्ते, हाजरो शिवसैनिक उपस्थित होते.