
३ हायवा व १ जेसीबी घेतली ताब्यात
तहसीलदार यांस केला अहवाल सादर
दै. चालु वार्ता
भोकर प्रतिनिधी
विजयकुमार चिंतावार
भोकर / नांदेड : तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुरुमाचे रात्री बेरात्री बेधडक पणे अवैधरीत्या सर्रासपणे उत्खनन केल्या जात होते बाजूलाच असलेल्या तालुक्यातील अवैध रेती सुद्धा मोठ्या प्रमाणात आणून विक्री केल्या जाते यानुसार गुप्त माहिती मिळाल्याने मिळालेल्या माहिती वरून भोकर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी शफाकत आमना यांनी दि. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे ४:३० वाजताच्या सुमारास थेरबन शिवारात अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करणारे ३ हायवा व १ जेसीबी पकडून भोकर पोलीस स्टेशनला जमा केले व तहसील कार्यालयाला सदरील अहवाल सादर केला आहे.
नियमानुसार उत्खनन हे रात्रीच्या वेळेस करू शकत नाहीत तरी पण भोकर तालुक्यात रात्री बेरात्री अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करून चोरी छुप्या मार्गाने विक्री करण्याचा प्रकार मागील काही दिवसापासून बेधडकपणे सर्रास चालू आहे व बाजूच्या मुदखेड व उमरी तालुक्यातून अवैद्य रेतीची वाहतूक सुद्धा रात्री बेरात्री चोरी छुप्या मार्गाने केली जाते अनेक वेळा रेतीचे हायवा व टिप्पर ही पकडण्यात आले होते तसेच मुरुमाचे ही हायवा व टिप्पर सुद्धा पकडण्यात आले होते तरीही मात्र अवैध धंदा करणाऱ्या लोकांनी आपले काम चालूच ठेवले आहे याबाबत भोकर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी शफाकत आमना यांना माहिती मिळाल्यावरून २६ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे अंदाजे ४:३० वाजताच्या सुमारास त्यांनी थेरबन शिवारात जाऊन अवैध रित्या मुरुमाचे उत्खनन करणारे ३ हायवा व १ जेसीबी पकडून धडक कारवाई केली व सदरील वाहने ही पोलिसांच्या ताब्यात दिले व पुढील कारवाईसाठी तहसीलदार भोकर यांच्याकडे सदरील अहवाल त्यांनी सादर केला.
भोकर तहसीलचे तहसीलदार विनोद गुंडमवार यांना याबाबत माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की माझ्याकडे अवैध मुरूम उत्खनन केल्या बाबतचा अहवाल पोलिसांनी सादर केला आहे अवैध उत्खनन करणाऱ्या ३ हायवा व १ जेसीबी यांचे चालक व मालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्या बाबतची त्यांनी माहिती दिली आहे.