
डेमोक्रॅट सारा मॅकब्राइड यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये निवडून आलेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर बनल्या आहेत.
डेलावेअरच्या महत्त्वाच्या जागेवरून त्यांनी निवडणूक जिंकली आहे. दरम्यान, रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांनी १९८ इलेक्टोरल कॉलेजमध्ये आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर डेमोक्रॅट पक्षाच्या कमला हॅरिस ९९ जागांवर आघाडीवर आहेत.
ट्रम्प यांची १७ राज्यांमध्ये आघाडी
डोनाल्ड ट्रम्प यांना ज्या १७ राज्यांमध्ये आघाडी मिळाली आहे. त्यात वायोमिंग, वेस्ट व्हर्जिनिया, टेक्सास, टेनेसी, साउथ डकोटा, साउथ कॅरोलिना, ओक्लाहोमा, ओहायो, नेब्रास्का, नॉर्थ डकोटा, मिसिसिपी, लुईझियाना, केंटकी, इंडियाना, फ्लोरिडा, आर्कान्सा, अलाबामा यांचा समावेश आहे. आहेत. ट्रम्प यांना या राज्यांमधून १७८ इलेक्टोरल कॉलेज मते मिळत आहेत.
कमला हॅरिस कोणत्या राज्यात आघाडीवर आहेत?
कमला हॅरिस यांना आघाडी मिळालेल्या नऊ राज्यांमध्ये कनेक्टिकट, डेलावेअर, इलिनॉय, मॅसॅच्युसेट्स, मेरीलँड, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, रोड आयलँड आणि व्हरमाँट यांचा समावेश आहे. त्यांना या राज्यांमधून ९९ इलेक्टोरल कॉलेज मते मिळत आहेत.
US Presidential Election Live Updates | अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीसाठी मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात मुख्य लढत आहे. अनेक राज्यांमध्ये मतदान संपल्यानंतरच मतमोजणी सुरू झाली असून निकालही येऊ लागले आहेत.