
15 ऑगस्ट 1975 रोजी रिलीज झालेल्या एका चित्रपटाने हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये इतिहास घडवला होता. या चित्रपटातून खरं प्रेम, खरी मैत्री आणि सूडाच्या भावनेपोटी केलेला संघर्ष दिसून आला होता.
चित्रपटातली वाक्ये अजरामर आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. जवळपास 50 वर्षांनंतरही चित्रपटातले अनेक सीन तसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात. तुम्हाला अंदाज आला असेलच आम्ही कोणत्या सिनेमाबद्दल बोलतो आहोत ते. होय आम्ही बोलतो आहोत ते ‘शोले’बद्दल. या चित्रपटातलं बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना हे वाक्य उच्चारलं की हात बांधलेला धर्मेंद आणि नंतर बसंतीसह टांग्यातून पळणारी हेमामालिनी ही दृश्ये समोर येतात. मात्र तुम्हाला कदाचीत माहिती नसेल टांग्यातले सीन देणारी बसंती या हेमा मालिनी नसून त्या होत्या रेश्मा पठाण.
बॉलिवूडमधल्या पहिली महिला स्टंट आर्टिस्ट
रेश्मा पठाण या बॉलिवूडमधल्या पहिल्या महिल्या स्टंट आर्टिस्ट होत्या. हा खुलासा खुद्द रमेश सिप्पीनी केलाय. जिथे पुरूष कलाकारांलासाठी स्टंट करणे ही धोक्याचं होतं त्यावेळी रेश्मा पठाण या स्टंटवुमन म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. शोलेतले हेमा मालिनी यांचे सगळे स्टंट रेश्मा यांनी केले होते. अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन रेश्मा यांचं कौतुक करताना दिसत आहेत. ते म्हणतात, ‘शोलेमध्ये हेमा मालिनी टांग्यात बसून शत्रूंपासून आपला बचाव करताना, तर थेट कोलांट्या उड्या खात त्यांच्यासोबत 2 हात करतानाचे सगळे स्टंट रेश्मा यांनी केले आहेत.’
पुढे रमेश सिप्पी म्हणतात की, ‘त्यांनी खूप धोकादायक शॉट दिलेत. एका सीनमध्ये घोडा धावत येताना दिसतो, घोडा यायच्या आत रेश्मा ते रस्त्यातून मुलीला उचलतात आणि तिचा जीव वाचवतात. हा खूप चांगला शॉट होता. पुढे हेमा मालिनी बोलतात, तुम्ही केलेल्या माझ्या डुप्लिकेटमुळे आमचं सगळ्यांचं नाव झालं. तुम्ही जे स्टंट केले ते माझ्या सगळं लक्षात आहेत. तुम्ही खूप कठीण आणि धोकादायक शॉट्स दिलेत.’ यावर रेश्मा गहिवरून जातात आणि म्हणतात, ‘तुम्ही मला कधी डुप्लिकेट म्हणून नाही तर हिरोईन म्हणूनच वागणूक दिली. तुमचंचही कौतुक आहे.’