
मी ओबीसी समाजाचा असल्याने मला टार्गेट,अशा धमक्यांना मी घाबरत नाही:-आरोग्यदूत डॉ.राहुल घुले
मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी,समाजसेवा सुरूच राहणार,विकास कामासाठी सदैव कटिबद्ध!
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
धाराशिव/भूम: वनरूपी क्लिनिक तसेच आरोग्यदूत डॉ.राहुल घुले भूम-परंडा- वाशी आरोग्यमित्र परिवार माध्यमातून मतदारसंघात गरजू रुग्णांचे मोफत ऑपरेशन,शेतकऱ्यांना बांधापर्यंत डीपीची मोफत वाहतूक सुविधा,खतना शिबिरे,मुलींच्या लग्नासाठी मंगल कार्य सेवा,वृद्धांना काठीचा आधार अशी समाजसेवा मतदारसंघात अहोरात्र केल्यामुळे पोटसूळ उठल्याने,मला धमक्या येत असल्याचा रासपाचे उमेदवार आरोग्यदूत डॉ.राहुल घुले यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.परंडा २४३ विधानसभा मतदारसंघांचे राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉ.राहुल घुले उमेदवार आहेत.जयवंतनगर येथे महायुतीचे उमेदवार यांनी गाव भेट दरम्यान डॉ.घुले जेल मध्ये दिसतील असे वक्तव्य केले होते. त्यावर डॉ.घुले यांनी प्रतिउत्तर दिले मी ओबीसी समाजाचा असल्याने मला टार्गेट करण्यात येत असल्याचे घुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. ते पुढे म्हणाले,राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवत आहे आणि लोकांचा मला भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने मला माझ्या मूळ असलेल्या गावांमध्ये सभा घेऊन जे की गावचा मी असून ही माझी भूमी असताना मला हे कुठल्या कारणाने धमकी दिली गेली ते जेलमध्ये टाकणार आहेत हे मला माहित नाही परंतु मी या मतदारसंघाचे माझ्यावर असलेले ऋण फेडण्याच्या हेतूने हजारो लोकांची समाजसेवा केली,यामुळेच मला प्रा.डॉ तानाजीराव सावंत जेलमध्ये टाकणार आहेत का ?असा प्रश्न विचारला.मी कालच पाचशे रुपयांचा स्टॅम्प माझ्या ओबीसी बांधवांसाठी शपथपत्र समर्पित केला,की मी आपल्या व आपल्या भागाच्या विकास कामासाठी सदैव कटिबद्ध राहून यामुळे मला जेलमध्ये टाकणार का ! मी करत असलेल्या या मतदारसंघातील समाजसेवेला सुद्धा या लोकांनी खेळ बसविण्याचा प्रयत्न केला. शासकीय अधिकाऱ्यकडून आमची कामे लटकवत ठेवण्यात आली या ना त्या अनेक कारणाने आमच्या कामामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.मात्र याचा सर्वतोपरी त्रास आम्हाला न होता थेट नागरिकांना लाभ घेण्यापासून झाला आहे,कारण जरी बस सेवा बंद केल्या असतील डहाणू पालघरच्या तरी तिथे लाभ घेणारे नागरिक जातच आहे.बस चालू केल्यामुळे एक लगत प्रवास होत होता. मात्र आता तीन ठिकाणी गाड्या बदलून जावा लागत आहेत.याचा त्रास नागरिकांनाच होत आहे.आम्हाला त्रास देऊ नका कारण आमचा त्रास हाच जनतेचा त्रास राहणार आहे आणि जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊ नका जेल माझ्यासाठी माहेर घर आहे.मी महाराष्ट्रातल्या मुंबई येथील ऑर्थर रोड जेलचा वैद्यकीय इन्चार्ज राहिलेलो आहे. अश्या धमक्या देऊ नका,मी धमक्यांना घाबरणारा नाही.मतदारसंघातील मायबाप जनता माझ्या पाठीशी असून यापुढे जसे मला प्रश्न मिळतील तसेच त्यांना उत्तर दिले जातील असे डॉ.घुले म्हणाले.