एकनाथ शिंदे हे 40-45 आमदार घेऊन गुवाहाटीला गेले. अजित पवार यांनी 30-40 सहकारी एकत्र करुन सत्तेत सहभागी झाले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना शिंदे त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. आत्ता ते मुख्यमंत्री आहेत. कोणत्याही मार्गाने सत्ता हातात ठेवायची हेच काम त्यांनी केले, अशी टीका शरद पवार एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

जुन्नर विधानसभा मतदारसंघातील ओतूर सभेत बोलतान शरद पवार म्हणाले, लोकसभेत धक्का बसल्यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. लाडक्या बहिणीला ते 1500 रुपये देत आहे. माझे मते लाडक्या बहिणीला आधारासोबत रक्षणाचीही गरज आहे. मागील आठ महिन्यांत 1600 मुलींचे अपहरण केले. ठाणे जिल्ह्यामध्ये शाळेतील दोन मुलींवर अत्याचार झाले. हे प्रकार सतत होतात.
मुलींच्या भगिनींच्या हातात 1500 रुपयांचे हातात ठेवायचे. आणि तुम्ही काय करायचे ते करा, अशी वृत्ती ठेवायची. आम्ही राज्यातील महिलांना तीन हजार रुपये महिना देऊ, एसटी प्रवास मोफत करू, मह्त्वाचे म्हणजे महिलांच्या विरोधात गुन्हेगारी करणाऱ्यांवर सक्त कारवाई करू, त्यांना संरक्षण देऊ, असे देखील शरद पवार म्हणाले.
पक्ष फोडायला अक्कल लागत नाही
पक्ष फोडायला अक्कल लागत नाही. पक्ष उभारायला अक्कल लागते. एखाद्याला उद्धवस्त करायला अक्कल लागत नाही. उभं करायला अक्कल लागते. जिथं अक्कल लागत नाही, याची आठवण ज्या लोकांना होत नाही त्या लोकांना त्यांची जागा दाखविण्याचा विचार घ्यावा लागतो, असे म्हणत शरद पवारांनी पक्ष पक्ष फुटल्यानंतर त्यांना साथ देणाऱ्यांना पराभूत करण्याचे आवाहन केले.
400 पार संविधान बदलण्यासाठीच
शरद पवार म्हणाले,नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये मी संरक्षणमंत्री होतो. आमचे खासदार हे 250 ते पावने तीनशे होते. तरी आम्ही देशाचा कारभार करू शकलो. पण नरेंद्र मोदींनी लोकसभेला 400 जागा देण्याचे आवाहन केले. 400 जागा का तर संविधान बदलण्यासाठी जास्त जागा लागतात म्हणून. ती कल्पना तुमच्या आमच्या सारख्याच्या हिताची नाही.

