
राजधानी मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये भीषण आग (Fire) लागल्याची माहिती असून आगीची वृत्त समजताच प्रशासनाकडून सर्व मेट्रो ऑपरेशन थांबवण्यात आले आहेत. त्यानंतर, मेट्रो (Metro) स्टेशनमधील सर्वच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
बीकेसी मेट्रो स्टेशन हे अंडरग्राउंड स्टेशन असून पहिल्यांदाच या ठिकाणी आग लागल्याची घटना घडल्याने सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे.