
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये मालिकेतील चौथा टी -२० सामना आज रंगणार आहे. भारतीय संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे ही मालिका ३-१ ने खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
मात्र हा सामना जिंकणं इतकं सोपं नसणार आहे. कारण गेल्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाच्या जवळ पोहोचला होता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये टफ फाईट पाहायला मिळू शकते. (India vs South Africa 4th T20I)
किती वाजता सुरू होणार सामना?
या मालिकेत आतापर्यंत ३ सामने खेळले गेले आहेत. मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० ला सुरू झाला होता. तर मालिकेतील दुसरे सामना १ तास आधी म्हणजे ७:३० ला सुरू झाला होता.
त्यानंतर मालिकेतील तिसरा सामना ८:३० ला सुरू झाला होता. आता मालिकेतील तिसरा सामना पुन्हा एकदा ८:३० सुरू होईल. त्यामुळे क्रिकेट फॅन्सला रात्री उशिरापर्यंत जागावं लागेल. तर टॉस ८ वाजता होईल.
भारतीय संघ २-१ ने आघाडीवर
भारतीय संघाने या मालिकेत २- १ ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ६१ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता.
मात्र शेवटी पराभवाचा सामना करावा लागला होता. यासह मालिका १-१ ने बरोबरीत आली होती. मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारतीय संघाने २-१ ने आघाडी घेतली. आता मालिकेतील शेवटचा सामना जिंकून भारतीय संघ ही मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.
या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ
भारत- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विश्याक, आवेश खान, यश दयाल.
दक्षिण आफ्रिका: एडेन मारक्रम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्जी, डोनोवन फरेरा, रिजा हेंड्रिक्स, मार्को जानसेन, हेनरिक क्लासेन, पेट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, नकाबा पीटर, रयान रिकेलटन, एंडिले सिमलेन, ट्रिस्टन स्टब्स