
थेट अॅट्रोसिटी दाखल करणार; पगारेंनी जे घडलं ते सांगितलं…
भाजप पदाधिकाऱ्यांनी कल्याण डोंबिवलीमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांना साडी नेसवणून सत्कार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांनी व्हायरल केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
मामा पगारे यांनी पत्रकार परिषदेत घेत भाजप पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधत मला फसवून बोलवून हे भ्याड कृत्य केल्याचे म्हटले तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी हे करत असताना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप देखील केला.
मामा पगारे यांनी सांगितले की, भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्यासी गैरवर्तन करत असताना जातीवाचक शब्दांचा वापर केला. जातीचा उल्लेख करत बहुजन समाजाचा अपमान केला. त्यामुळे गैरवर्तन करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत पोलिस ठाण्यात तक्रार देणार आहे.
ते म्हणाले, ‘मी 50 वर्ष डोंबिवलीत निष्कलंक घालवली, एक डागही लावून घेतला नाही. आज हा माझा अपमान नाही. त्यांनी मला जी जातीवाचक शिवीगाळ केली तो सर्व बहुजन समाज आहे त्याचा तो अपमान आहे. भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये हिंमत नव्हते म्हणून त्यांनी फसवूण बोलावले. अन्यथा मला चॅलेंज करायचे होते मी पण काँग्रेसचे पदाधिकारी घेईन आलो असतो आणि तुम्हाला काँग्रेसची ताकद दाखवली असती.
भाजपकडून कृतीचे समर्थन
भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परब यांनी मामा पगारे यांना साडी नेसवण्याच्या कृतीचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, पगारे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पोस्ट ही निंदनीय होती. त्यांनी ज्या पद्धतीने फोटो व्हायरल केला त्याच पद्धतीने त्यांचा आम्ही सत्कार केला. आम्ही पोलिसांना देखील निवेदन देत पंतप्रधान मोदी यांची बदनामी करणाऱ्याच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.