
महाराष्ट्रात निवडणुका झाल्या, निकाल लागले. महायुतीला भरभरुन मतंही मिळाली. बहुमताचे सरकार स्थापन करण्यास विलंब का होत आहे हा प्रश्न राज्यातील जनतेला पडला.
त्यातच एकनाथ शिंदे हे गृहखाते हवे म्हणून नाराज असल्याच्या चर्चाही जोरदार झाल्या. आता एक बातमी आली असून सुत्रांच्या म्हणण्यांनुसार एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी आपला गृहमंत्रालयावरील दावा सोडल्याचे वृत्त आहे.
थोडक्यात इतिहास
एकनाथ शिंदे हे राज्याच्या राजकारणात 2022 पासून चर्चेत आले. बंडखोरी करुन चाळीस आमदारांसह ते जेव्हा सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी येथे गेले. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि शिवसेना फुटली. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले अन् सत्तेचा कार्यकाळ संपताच त्यांना राजीनामाही द्यावा लागला. हा झाला इतिहास पण आताही त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते.
शिंदेंची बार्गेनिंग पाॅवर झाली कमी
एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला पाठींबा असल्याचे म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य आहे असे म्हणत त्यांनी आपला मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला पण गृहमंत्रालय एकनाथ शिंदेंना हवे होते. ते आपल्याच पक्षाला मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते पण भाजपकडे असलेले जास्त संख्याबळ पाहता त्यांची बार्गेनिंग पाॅवर कमी झालेली आहे. त्यामुळेच आधी सीएमपद नंतर होम मिनिस्ट्रीही त्यांच्या हातून गेली आहे.
शिंदेंच्या मनधरणी करण्यात भाजपला यश
एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्यात भाजपच्या नेत्यांना यश आले आहे असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे ते गृहमंत्रीपदाचा दावाही सोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद आणि नगरविकास खात्याची जबाबदारी मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा हत्ताही सोडला आहे.
रखडलेली बैठक आता कधी?
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनाट्यामुळे आणि काही राजकीय कारणांमुळे महायुतीच्या खातेवाटपाची बैठक रखडली होती. आता एकनाथ शिंदेंची नाराजी संपल्यामुळे ही बैठक पुन्हा होईल, मात्र ती कधी होईल यावर अद्याप स्पष्टता नाही.